26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriआंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा…..

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा…..

हा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांनी उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आलेल्या जिल्ह्यातील ११ हजार ७८३ आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ३ महिन्यांच्या व्याजमाफीची कमाल रक्कम २ कोटी ७१ लाख ४६ हजार रुपये तर रुपांतरीत कर्जावरील ४ कोटी ९८ लाख ८५ हजारांची कर्जावरील व्याजमाफी अदा करण्याचा निर्णय झाला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नांतून रत्नागिरी जिल्हयातील आंबा उत्पादक आणि पारपिटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी हा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांनी उदय सामंत यांचे आभार मानले आहेत. जिल्ह्यातील ११ हजार ७८३ अवेळी पाऊस व गारपीट आपद्रस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांच्या व्याजमाफीची कमाल रक्कम २ कोटी ७१ लाख ४६ हजारांची तर, रुपांतरित कर्जावरील ४ कोटी ९८ लाख ८५ हजारांची कर्जावरील व्याजमाफी (कार्यक्रम) या योजनेंतर्गत अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच सन २०१४-१५ या वर्षातील पीक कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांचे सन २०१५-१६ या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील ४ वर्षाचे ६% दराने होणारे व्याज (कमाल रु. ४९८.८५ लाख) रुपांतरित कर्जाचा वार्षिक हप्ता विहीत मुदतीत परत करण्याची व हे शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित असण्याची अट शिथील करुंन रुपांतरित कर्जावरील व्याजमाफी (२४२५२५०६) योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी राहूल शिंदे यांनी शुक्रवारी निर्गमित केला आहे.

जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्यांबाबत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ५ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत माहे फेब्रुवारी व मार्च, २०१५ मध्ये अवेळी पाऊस वरपीट यामुळे शेतजमिनींचे व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या आपद्गस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफी तसेच सन २०१४-१५ या वर्षातील रूपांतरित कर्जावरील सन २०१५-१६ या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षांचे ६% दराने होणारे व्याज शासनामार्फत सरसकट अदा करण्याची मागणी करण्यात आली होती. या बैठकीतील निर्णयास अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी ८ नोव्हेंबर व ९ नोव्हेंबर २०२३ च्या पत्रांन्वये शासनास प्रस्ताव सादर केला होता. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular