26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeEntertainmentबिपाशाच्या घरी झाले लहानग्या “देवी” चे आगमन

बिपाशाच्या घरी झाले लहानग्या “देवी” चे आगमन

दोघेही आपल्या बाळासाठी खूप उत्सुक होते, अखेर लग्नाच्या ६ वर्षानंतर या जोडप्याची प्रतीक्षा संपली.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आई झाली आहे. अभिनेत्रीने १२ नोव्हेंबर रोजी राजकुमारीला जन्म दिला आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. दोघेही आपल्या बाळासाठी खूप उत्सुक होते, अखेर लग्नाच्या ६ वर्षानंतर या जोडप्याची प्रतीक्षा संपली.

बिपाशाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या मुलीच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली आहे. पोस्ट शेअर करताना बिपाशाने लिहिले- ‘देवी बासू सिंग ग्रोव्हर आमच्या आईच्या प्रेम आणि आशीर्वादाच्या घरात एक पवित्र आत्मा आहे’.

बाळाच्या जन्माआधीच बिपाशाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या घरी मुलगी जन्माला यावी. मीडियाशी बोलताना बिपाशा म्हणाली- ‘जेव्हाही मुलाचा प्रश्न आला तेव्हा तिला आणि करणला नेहमी वाटत होतं की घरात मुलगी जन्माला यावी. एवढेच नाही तर आपण आपल्या बाळाला she म्हणतो.

बिपाशा बसूने यावर्षी ऑगस्टमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून बिपाशाने तिच्या प्रेग्नेंसीच्या दिवसांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बिपाशाने अनेक मॅटर्निटी शूट्स केले आहेत, तसेच या जोडप्याने प्रेग्नेंसीच्या टप्प्यातील अनेक व्हिडिओ देखील शेअर केले आहेत, ज्यांना यूजर्सनी खूप पसंती दिली आहे. बिपाशा आणि करणच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या सोशल मीडियावर बराच काळ गाजत होत्या. मात्र, या जोडप्याने यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही.

३० एप्रिल २०१६ रोजी बिपाशा आणि करणचे लग्न झाले होते. करण आणि बिपाशा ‘अलोन’च्या सेटवर भेटले होते. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर करण आणि विपाशाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. बिपाशा करणची तिसरी बायको आहे, त्याआधी करणने टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि श्रद्धा निगमसोबत लग्न केले होते, पण दोघांचे लग्न फार काळ नाही टिकले.

RELATED ARTICLES

Most Popular