27.6 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriबिपरजॉय'चा प्रभाव वेगवान वाऱ्यासह समुद्र खवळलेला

बिपरजॉय’चा प्रभाव वेगवान वाऱ्यासह समुद्र खवळलेला

बिपरजॉय वादळाच्या प्रभावामुळे खेड, गुहागर, दापोली, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. किनारी भागात वेगवान वारे वाहत असून, समुद्रही खवळलेला आहे. रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे, गावखडी, मिऱ्या, गणपतीपुळे येथे भरतीवेळी समुद्राच्या लाटा उसळत होत्या. वादळामुळे नुकसान झाल्याची घटना घडलेली नाही; मात्र जिल्हा प्रशासनाच्या आवाहनामुळे किनारी भागातील नागरिक सतर्क झाले होते. जिल्ह्यात शनिवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासांत सरासरी २ मि.मी. पावसाची नोंद झाली. गेले दोन दिवस बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर जाणवण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. आज पहाटेच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. वेगवाने वारेही वाहत होते.

रत्नागिरी शहरासह परिसरातील गावांमध्ये पावसाची नोंद झाली. पंधरा ते वीस मिनिट पडलेल्या हलक्या पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते. चक्रीवादळ पुढे सरकत उत्तरेकडे गेल्यामुळे मोठा परिणाम जाणवलेला नाही; परंतु दिवसभर किनारी भागात वारे वाहत होते. दापोलीत हर्णे, आंजर्ले परिसरात पहाटेला वारे वाहत होते. प्रशासनाच्या आवाहनामुळे खाडी किनारी छोट्या होडीने मासेमारी करणारेही समुद्रात गेले नाही. शुक्रवारी सायंकाळी गावखडी किनाऱ्यावरील सुरूची झाडे लाटांच्या तडाख्यात वाहून गेली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular