27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRajapurसाखरीनाटे बंदराला मिळणार नवा साज विकासासह पायाभूत सुविधांची उभारणी

साखरीनाटे बंदराला मिळणार नवा साज विकासासह पायाभूत सुविधांची उभारणी

दरवर्षी मच्छी व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असलेल्या तालुक्यातील साखरीनाटे येथील प्रस्तावित बंदराच्या विकासासह या ठिकाणी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी १५३.४७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला शासनाकडून प्रशासकीय मान्यता दिली असून, त्यातून साखरीनाटे बंदराचा विकास होणार असल्याची माहिती राजापूर मतदारसंघाच्या निवडणूकप्रमुख उल्का विश्वासराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पावसाळ्यानंतर या कामाला सुरवात होणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी भाजपच्या शीतल पटेल, अॅड. सुशांत पवार, मारुती कांबळे, चंद्रकांत लिंगायत, मच्छीमार नेते अमजद बोरकर, शहराध्यक्ष विवेक गुरव उपस्थित होते.

तालुक्यातील साखरीनाटे येथील बंदरामध्ये मच्छीमारी व्यवसाय करताना मच्छीमार बांधवांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बंदराचा विकास करताना या ठिकाणी पायाभूत सुविधांची उभारणी व्हावी, अशी अपेक्षा मच्छीमार बांधवांकडून केली जात होती. त्या दृष्टीने सातत्याने आपण शासनाकडे प्रयत्नशील होतो. दरम्यान, मत्स्य व्यवसायमंत्री मुनगुंटीवार यांची भेट घेऊन मच्छीमार बांधवांची समस्या आपण त्यांच्याकडे मांडली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना साखरीनाटे बंदराच्या विकासासाठी शासनाकडून १५३.४७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती विश्वासराव यांनी दिली.

हा निधी मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास निधी या योजनेंतर्गत मंजूर झाल्याचे सांगितले. या निधीतून बंदरामध्ये आलेल्या बोटी नियोजनबद्ध रितीने उभ्या राहण्यासाठी टर्मिनल उभारणी करणे, मासळी दीर्घकाळ टिकावी यासाठी आईस फॅक्टरी, उपहारगृहे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, फिश ऑक्शन हॉल आदींसह पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular