भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चातर्फे रत्नागिरी नगरपालिकेत एकत्र येत शहरातील समस्यांचा पाढा वाचण्यात आला. गणेश उत्सवपूर्वी पावसाळी डांबर वापरून खड्डे भरणे, उनाड गुरे, स्ट्रीट लाईट दुरुस्त करणे, मच्छर प्रतिबंधक फवारणी करणे इतर शहरातील विविध प्रश्नांवर टाळ मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी नगरपरिषदमध्ये टाळ वाजवत आरती म्हणून निषेध करण्यात आला. त्यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री बाबर यांच्याशी चर्चा करण्यात आली.
त्यावेळी त्यांनी गणपतीच्या आधी शहरातील सर्व खड्डे भरणे, स्ट्रीट लाईट दुरुस्त करू असे सांगितले. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सोमेश्वरमधील काही ग्रामस्थांनी संपर्क करून आम्ही शहरातील उनाड गुरांचे पालन करू त्यासाठी गुरे आमच्या इथे आणून द्यावी असे त्यांनी सांगितले होते. त्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली. त्यावर बाबर यांनी गुरे तिथे पोच करू व त्यांना लागणारा चारा पाणी खर्चाची थोडीफार तरतूद करू असे सांगितले. तसेच चंपक मैदान येथे उनाड गुरांसाठी सोय करण्यात येणार असल्याचेही सांगितले.