27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriभाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज रत्नागिरीत

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज रत्नागिरीत

विजय संकल्प यात्रेच्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवारी रत्नागिरीत येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात बावनकुळे यांच्या स्वागताचे बॅनर्स आणि फलक झळकत असून भाजपाच्या कमळाचे झेंडे जागोजागी लावून मोठी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. या दौऱ्यात रत्नागिरीतील राम मंदिरात जावून ते दर्शन घेणार असून त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांची एक रॅली रामआळी ते लक्ष्मी चौक अशी निघणार आहे. याच ‘रॅलीला संकल्पयात्रा असे नाव देण्यात आले आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. विजयी संकल्प यात्रेच्या माध्यमातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साऱ्या म हाराष्ट्रात दौरा करत आहेत. गुरुवारी ते रत्नागिरीत येणार आहेत. या दौऱ्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट संचारली आहे. आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी साऱ्या शहरात झेंडे, कमानी आणि फलक लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. भाजपच्या कमळ या निशाणीच्या पताक्यांची एक माळच शहरातील संपूर्ण रामआळीत एका बाजूने लावण्यात आली असून दुसऱ्या बाजूला भाजपचे झेंडे झळकत आहेत. वातावरण निर्मिती चांगली करण्यात आली आहे.

१९ ऑक्टोबरला सकाळी बावनकुळेंचे आगमन होताच जंगी स्वागत करण्यात येणार आहे. बावनकुळेंच्या उपस्थितीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ३०० प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील जैन मंदिर आणि राम मंदिर या २ देवालयांना ते भेट देणार आहेत. प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिरात जावून दर्शन घेतल्यानंतर सकाळी ११.१५ वा. रामआळीतूनच भाजपा कार्यकर्त्यांची रॅली निघणार असून सकाळी १२.४५ वा. ती स्वा.लक्ष्मी चौकात ही रॅली पोहोचताच तेथे बावनकुळे यांची कॉर्नर सभा होणार आहे. या सभेनंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नाणीज येथे जगद्गुरु नरेंद्राचार्याजी महाराज यांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular