27.5 C
Ratnagiri
Tuesday, December 3, 2024

एकनाथ शिंदेंनी भाजपची झोप उडविली सरकारला बाहेरून पाठिंब्याचा प्रस्ताव?

मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंनी...

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडीचे संकेत

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडीचे संकेत...

‘कोरे’चे विलीनीकरण झाल्यास गुंतवणूक सुलभ – अॅड. विलास पाटणे

कोकण रेल्वे महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर रेल्वे मंत्रालयाने...
HomeRatnagiriभाजप ठरवणार निकाल की 'निक्काल', चाकरमानीही ठरणार प्रभावी

भाजप ठरवणार निकाल की ‘निक्काल’, चाकरमानीही ठरणार प्रभावी

भाजपसह मुस्लिम मतांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

विधानसभेसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत झालेले मतदान हे ठाकरे शिवसेनेच्या अस्तित्वाची परीक्षा बघणारे आहे. भाजपची मते जिल्ह्यात महत्त्वाची ठरणार आहेत. रत्नागिरी, चिपळुणात महायुती, गुहागरमध्ये महाविकास आघाडी, तर दापोली, राजापुरात काँटे की टक्कर होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरल्यामुळे चुरस वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५ विधानसभा मतदारसंघांत आज मतदान झाले. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत दोन शिवसेना आमने- सामने आलेल्या आहेत. चिपळूणमध्ये दोन राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात प्रभाव निर्माण करणाऱ्या भाजपने महायुतीतील शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांवर टांगती तलवार ठेवलेली आहे. रत्नागिरीत परिवर्तन हा परवलीचा शब्द ग्रामीण भागापासून रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत होता.

शिंदे शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांचा पक्षापेक्षाही वैयक्तिक असलेला संपर्क आणि ताकद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, भाजपसह मुस्लिम मतांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी ठाकरे सेनेचे बूथही लागलेले नव्हते. ठाकरे सेनेकडून बाळ माने यांनी शेवटपर्यंत राबविलेली प्रचार यंत्रणा तितकीशी प्रभावी नव्हती. त्याचा प्रत्यय मतदानावेळी आला. दापोली मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे योगेश कदम आणि ठाकरे शिवसेनेचे संजय कदम यांच्यात चुरस आहे. याठिकाणी भाजपची मते अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. गुहागरमध्ये ठाकरे शिवसेनेचे बडे नेते भास्कर जाधव आणि शिंदे शिवसेनेचे राजेश बेंडल यांच्यात थेट लढत आहे. बेंडल हे कुणबी समाजाचे नेते असून मतदारसंघात कुणबी समाजाचा प्रभाव अधिक आहे.

त्यांचा कल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्यापुढे अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी चांगली लढत दिली आहे. ठाकरे सेनेची फळी यादवांच्या बाजूने उभी राहिल्यामुळे चुरस वाढली आहे. राजापूर मतदारसंघात ठाकरे शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार राजन साळवी रिंगणात असून, पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत है शिंदे शिवसेनेकडून रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीचे घटक पक्षातील काँग्रसचे अविनाश लाड अपक्ष म्हणून राजापुरातील चुरस वाढविली आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाचा असलेला प्रभाव लक्षात घेता आणि मुंबईकर चाकरमानीही मतदानासाठी उतरल्यामुळे आघाडी पुढे आव्हान निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular