27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriअखेर संशयकल्लोळावरचा पडदा उठला, "ते" विधी आरोग्य सुधारण्यासाठी

अखेर संशयकल्लोळावरचा पडदा उठला, “ते” विधी आरोग्य सुधारण्यासाठी

संबंधित व्यक्तीच्या आरोग्य सुधारण्याकरता केलेला विधी आहे, असे निष्पन्न झाल्याने गावातील राजकीय वातावरण निवळले.

सध्या राज्यामध्ये शिवसेनेमध्ये उभी फुट पडल्यामुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका गावामध्ये शिवसेनेने आम्ही कसे निष्ठावंत आहोत, याकरिता तुफान बॅनरबाजी करणारे पोस्टर नाखरे बौद्धवाडी फाट्यावर लावण्यात आले होते. तसेच या ठिकाणी तिठा म्हणजेच तीन रस्ते येतात. त्यामुळे अनेक भाविक लोक काही विधी या फाट्यावर करतात. तसाच काहीसा प्रकार इथे करण्यात आल्याचे समोर आले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे परिसरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने बॅनर लावण्यात आले होते. मात्र बॅनरचा भाग तीन रस्ते म्हणजे तिठा असल्याने एका इसमाने तब्येत बरी होण्यासाठी त्याच्या अंगावरून काढलेल्या उताराच्या वस्तू या बोर्डाच्या जवळ ठेवण्यात आल्यामुळे खळबळ निर्माण झाली होती. अनेकांनी राजकारण देवदेवस्कीच्या थराला गेल्याचे म्हटले. मात्र ही देव देवस्की व करणी नसून यात राजकारणाचा काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे संबंधित व्यक्तीच्या आरोग्य सुधारण्याकरता केलेला विधी आहे, असे निष्पन्न झाल्याने गावातील राजकीय वातावरण निवळले.

निष्ठावंत शिवसैनिकांचे सध्या महत्त्व कमी झाल्यामुळे त्याला गती प्राप्त व्हावी, याकरिता या बॅनरच्या माध्यमातून आमची संघटना संपवली जात असल्याचे चित्र गावांमध्ये पसरवण्यात आले. परंतु अशा प्रकाराने कोणताही परिणाम होत नाही, असे चर्चिले जात होते.

यासंदर्भात नाखरे गावचे पोलीस पाटील श्री सुधीर वाळिंबे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले ‘राज्यामध्ये शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे या गावांमध्ये असलेले अस्तित्व नष्ट केले जात असल्याचे पदाधिकाऱ्यांना वाटल्यामुळे या बॅनरचे राजकारण केल्याचे चित्र दिसून आले मात्र प्रत्यक्षात आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही गोष्टीचा उपयोग होत नसल्याने या गोष्टी केल्याचे ग्रामस्थाने सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular