HomeKhedलोटे औद्योगिक वसाहतीतील दोन्ही दुर्घटना हलगर्जीपणामुळे

लोटे औद्योगिक वसाहतीतील दोन्ही दुर्घटना हलगर्जीपणामुळे

या आगीत कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

लोटे औद्योगिक वसाहतीत रविवारी झालेल्या रिअॅक्टरचा स्फोट आणि भीषण आगीच्या दुर्घटनेला कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी कोल्हापूर औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी केलेल्या चौकशी अती प्राथमिक तपासात दोन्ही कंपनी व्यवस्थापनावर ठपका ठेवला आहे. फॅक्टरी अॅक्टनुसार, आता या दोन्ही कंपन्यांवर कारवाईची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृतपणे अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. लोटेतील अॅक्विला ऑरगॅनिक कंपनीत रविवारी ( २५ मे) दुपारी झालेल्या रिअॅक्टर स्फोटात दोन कामगार जखमी झाले होते. त्यातील दिलीप दत्तात्रय निचते या कामगाराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या कामगारावर नवी मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी रविवारी दुपारी लासा सुपरजेनिक कंपनीतही भीषण आग लागली.

या आगीत कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. एकाच दिवशी घडलेल्या या दुर्घटनांनी लोटे परिसर हादरला. यामुळे कंपन्यांच्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्न निर्माण होत आहेत. दोन्ही दुर्घटनांची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहाय्यक संचालक नंदकुमार वेळे लोटे येथे दाखल झाले. त्यांनी सोमवारीही दोन्ही कंपन्यांमध्ये जाऊन या घटनी चौकशी केली. दरम्यान, या दोन्ही दुर्घटनांचा प्राथमिक अहवाल औद्योगिक सुरक्षा विभाग कोल्हापूरच्या सहसंचालकांकडे पाठवला आहे. हलगर्जीपणाचा ठपका त्यांमध्ये ठेवण्यात आला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृतपणे कोणतीही कारवाई अद्यापि करण्यात आलेली नाही. औद्योगिक सुरक्षा विभागाकडून केलेल्या चौकशीत दोन्ही कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. प्राथमिक अहवालात तसा ठपका ठेवला असून, फॅक्टरी अॅक्टनुसार संबंधितावर कारवाई केली जाणार आहे, असे प्रदीप भिंताडे (उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा विभाग, कोल्हापूर) यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular