29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeMaharashtraदोन्ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील, परीक्षेबाबत संभ्रम बाळगू नये- शालेय शिक्षणमंत्री

दोन्ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील, परीक्षेबाबत संभ्रम बाळगू नये- शालेय शिक्षणमंत्री

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटल आहे कि, आम्ही कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत. १५ फेब्रुवारीपर्यंत परिस्थितीचा आढावा घेणार आहोत.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाहता, अद्याप ती विशेष कमी झालेली दिसत नाही. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या पूर्वनियोजित परीक्षा पुढे ढकलणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. त्यातच राज्याचे शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी १० वी आणि १२ वीच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात याव्या अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार का? असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होत आहे.

परीक्षेच्या गोंधळाबद्दल अखेर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटल आहे कि, आम्ही कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत. १५ फेब्रुवारीपर्यंत परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, पुरवणी परीक्षा असते. कोविड परिस्थितीमुळे जे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकले नाहीत ते पुरवणी परीक्षेत बसवाव लागतं. सर्व गोष्टी एकावर एक अवलंबून असतात. त्यानंतर अकरावीचे प्रवेश असतात. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तो पूर्ण विचार करूनच घेतला पाहिजे. आम्ही शैक्षणिक बोर्डासोबत चर्चा करत आहोत,  अभ्यासक्रमाच्या संदर्भातही चर्चा होत आहे.

कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांची सर्व तयारी पूर्ण झाली असून दोन्ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील,  असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी आणि पालकांनी संभ्रमात राहू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर परिणाम झाला होता. मागील वर्षी तर ठरलेली परीक्षा पूर्णपणे रद्द करून केवळ शालेय सरासरी गुणांनुसार निकाल जाहीर करण्याची वेळ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर आलेली. मात्र मागील वर्षीच्या तुलनेमध्ये  राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने, लसीकरण सुद्धा सुरळीत सुरु असल्याने आणि आता शाळाही सुरू झाल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा त्याही ऑफलाइन घ्याव्यात अशी मागणी सर्वच क्षेत्रांतून होत होती. त्यानुसार यंदा बारावीची परीक्षा ४ मार्चपासून तर दहावीची परीक्षा १५ मार्चपासून घेण्याची घोषणा शिक्षण विभागाने महिनाभरापूर्वीच केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular