25.8 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeKhedमुंबई-गोवा महामार्गावरील चार पुलांची कामे अपूर्ण

मुंबई-गोवा महामार्गावरील चार पुलांची कामे अपूर्ण

दुरुस्ती करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली येथील गड नदीवरील पूल आणि संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पूल, सप्तशृंगी नदी आणि बावनदी येथील पुलांचेही काम अपूर्ण आहे. तसेच चिपळूण येथील बहादूर शेख नाक्याजवळ उड्डाण पुलाच्या बांधकामाचे गर्डर गेल्या ऑक्टोबर महिन्यात कोसळले. त्याची दुरुस्ती करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली रस्त्यांची कामे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी पूर्ण होतील, असे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत होते. मात्र, ती मुदतही टळून गेली.

पर्यावरणविषयक परवानग्या मिळण्यास झालेला उशीर, भूसंपादनाची रखडलेली कामे, कंत्राटदारांची निष्क्रियता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे महामार्गाची कामे रखडली आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग ६६) च्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामांसह इतर सर्वच गोष्टींची कामे ३१ डिसेंबर २०२४ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. मुंबई गोवा महामार्गावरील कामात होणाऱ्या विलंबाबात वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना बुधवारी न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले.

निवळी घाटातील कामही बऱ्याच प्रमाणात बाकी आहे. तेथून पुढे लांजापर्यंतचे काम वेगाने पूर्ण होण्याची चिन्हे आहेत, पण प्रत्यक्ष लांजा बाजारपेठेतील उड्डाण पूल रखडला आहे. चिपळूणजवळ परशुराम घाटातील धोकादायक आणि आव्हानात्मक कामही पावसाळ्यानंतर झपाट्याने पूर्ण होत आले असून घाटातील दोन्ही मार्गिका लवकरच पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. पण चिपळूण येथील बहादूर शेख नाक्याजवळ उड्डाण पुलाच्या बांधकामाचे गर्डर गेल्या ऑक्टोबर महिन्यात कोसळून झालेल्या अपघातामुळे या टापुतील कामाचे वेळापत्रक एक वर्षनि पुढे गेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular