24.5 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeInternationalब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे ९६ व्या वर्षी निधन

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे ९६ व्या वर्षी निधन

एलिझाबेथ द्वितीय राणी १५ देशांची महाराणी होती, ज्याला कॉमनवेल्थ क्षेत्र म्हणून ओळखलं जातं.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी ८ सप्टेंबर २०२२ निधन झाले. एलिझाबेथ द्वितीय त्यांचे वडील किंग जॉर्ज पाचवे यांच्या निधनानंतर १९५२ मध्ये ब्रिटनच्या सिंहासनावर बसल्या. २ जून १९५३ रोजी त्यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे वेस्टमिन्स्टर ॲबे येथे झाला. या वर्षी १ जून रोजी एलिझाबेथ यांच्या राजवटीला ७० वर्षे पूर्ण झाली होती. राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत १४ ब्रिटीश पंतप्रधान पाहिले आहेत. अमेरिकेच्या १३ राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे.  वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटन आणि कॉमनवेल्थच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी होत्या. ९६ वर्षीय एलिझाबेथ या सध्याच्या जगातील सर्वात वृद्ध शासक देखील होत्या. त्यांच्या आधी हा विक्रम राणी व्हिक्टोरियाच्या नावावर होता, ज्यांनी १८६७ ते १९०१ पर्यंत सुमारे ६४ वर्षे राज्य केलं होतं. एलिझाबेथ द्वितीय राणी १५ देशांची महाराणी होती, ज्याला कॉमनवेल्थ क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. एलिझाबेथ द्वितीय ही एकमेव राणी होती जी एकापेक्षा जास्त देशांची राणी होती.

जगातील शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत एलिझाबेथ यांचा समावेश व्हायचा. परदेश यात्रेदरम्यान पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नसलेल्या त्या जगातील एकमेव महिला होत्या. महाराणी एलिझाबेथ यांची एकूण संपत्ती किती? त्यांच्या उत्पन्नाची प्रमुख साधनं काय? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. शाही कुटुंबातील सदस्यांना करदात्यांकडून खूप मोठी रक्कम मिळते. याशिवाय शाही कुटुंबाला सोव्हेरिन ग्रँट, प्रिवी पर्स आणि त्यांच्या खासगी संपत्तीमधून उत्पन्न मिळतं.

राणी एलिझाबेथ यांचा उत्तराधिकारी त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स आहे. चार्ल्स ७३ वर्षांचे आहेत. मात्र, जोपर्यंत राणी एलिझाबेथ जिवंत होत्या, तोपर्यंत चार्ल्स सिंहासनावर बसण्याची शक्यता नव्हती. चार्ल्स यांचा जन्म एलिझाबेथ यांनी सिंहासनावर बसण्याच्या अवघ्या ३ वर्षांपूर्वी झाला होता. लंडनमध्ये राणीच्या निधनानंतर काय परिस्थिती उद्भवू शकते याबाबतही रिपोर्टमध्ये अंदाज व्यक्त केला आहे. राणीचे निधन झाल्यानंतर नविन राजा चार्ल्स हा ब्रिटनच्या चार राष्ट्रांमध्ये दौरा करेल. तसंच राणीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular