28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriरत्नागिरी पालिकेकडून हात वर खोदाईत केबल तुटल्याने ब्रॉडबॅण्ड सेवा ठप्प

रत्नागिरी पालिकेकडून हात वर खोदाईत केबल तुटल्याने ब्रॉडबॅण्ड सेवा ठप्प

शहरातील जेलनाक्यापासून खाली मुख्य मार्गावरील गटार खोदाईचे काम पालिकेने सुरू केले आहे; परंतु जेसीबी चालकांकडून बेजबाबदारपणे खोदाई सुरू आहे. बीएसएनएलसह अन्य कंपन्यांच्या ब्रॉडबॅण्डच्या लाईन आहेत. त्याचा विचार न करता खोदाई करून त्या तोडल्या आहेत. तोडलेल्या केबल रातोरात चोरीला गेल्यामुळे शहरात बीएसएनएलचे लॅण्डलाईन आणि ब्रॉडबॅण्ड सेवा गेली दोन दिवस ठप्प झाली आहे. पालिकेने मात्र याबाबत केवळ जेसीबी चालकाला काळजीपूर्वक खोदाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगून वेळ मारून नेली आहे. पावसापूर्वीची तयारी म्हणून पालिकेने शहरात बुजलेले आणि फुटपाथच्या खाली गेलेली गटारे खोदून सफाई आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

या गटाराच्या बाजूने भूमिगत वाहिन्या आहेत. यामध्ये बीएसएनएल कंपनीची ब्रॉडबॅण्डची केबलही आहे. शहरात विविध शासकीय,निमशासकीय आणि खासगी कार्यालयांना याद्वारे ब्रॉडबॅण्ड सेवा दिली गेली आहे. खासगी कंपन्यांचे जाळे पसरण्यापूर्वीच बीएसएनएलचे मोठे जाळे शहरात आहे. काही दिवस जेसीबीने गटार खोदण्याचे काम सुरू आहे; मात्र जेसीबी चालकाच्या निष्काळजी आणि बेजबाबदारपणामुळे जमिनीखाली असलेल्या बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड केबलच तोडली आहे. एकदा नव्हे तर तीनवेळा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी ती दुरुस्त करून सेवा सुरू केली; तरीही जेसीबीचालक मुजोरी करत ती वारंवार तोडत आहे.

एवढेच नाही तर दोन ठिकाणी ती तांब्याची केबलही गायब केल्याचे प्रकार घडल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पालिकेने अशा ठेकेदाराला योग्य ती समज देण्याची गरज आहे. ठेकेदाराच्या या निष्काळजीपणामुळे गेले दोन दिवस बीएसएनएलची लॅण्डलाईन आणि ब्रॉडबॅण्ड सेवा बंद आहे. यामुळे अनेक ग्राहकांची गैरसोय झाली असून बीएसएनएल कंपनीने आता पालिकेच्या त्या ठेकेदाराकडे बोट दाखवले आहे.

तुटलेली केबल गेली चोरीला – बीएसएनएल कंपनीने ग्राहकांच्या तक्रारीनंतर एकदा नव्हे दोन ते तीनवेळा ब्रॉडबॅण्डची तुटलेल्या केबलची दुरुस्ती केली. मागे दुरुस्ती केली की, पुढे बेजबाबदार जेसीबीचालक केबल तोडत आहे. त्यामुळे आम्ही कितीवेळा दुरुस्त करायची? नुसती केबल तोडली जात नाही तर ती चोरीलाही गेली आहे अशा गैरप्रकारांमुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे, असे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

RELATED ARTICLES

Most Popular