27 C
Ratnagiri
Sunday, October 27, 2024
HomeMaharashtraगरीबी झाकण्यासाठी झोपडपट्ट्यांवर बुलडोझर

गरीबी झाकण्यासाठी झोपडपट्ट्यांवर बुलडोझर

केंद्र सरकारने दिल्लीत तीन दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला आहे.

दिल्लीत होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेविरोधात पंजाबमध्ये शेतकरी आणि मजूर प्रचंड आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारची धोरणे देशविरोधी असून देशाला गुलामगिरीकडे ढकलणारी असल्याचा आरोप करत तब्बल १६ शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या असून पंजाबमध्ये ९० ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

या परिषदेत सहभागी होणाऱ्या राष्ट्रांना भारतातील हवाई मार्गांपासून ते सागरी मार्ग, पाणी आणि खाणकाम अशा सर्वच महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवायचे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून दूरसंचार आणि रेल्वे आधीच विकल्या गेल्या आहेत. याला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. केंद्र सरकारने दिल्लीत तीन दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत असल्याचे पंजाब मजदूर संघर्ष समितीचे सर्वन सिंग पंढेर म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular