25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeChiplunकशेडी घाटात गणेशभक्तांच्या मार्गात खड्ड्यांचेही 'विघ्न'!

कशेडी घाटात गणेशभक्तांच्या मार्गात खड्ड्यांचेही ‘विघ्न’!

चाकरमान्यांना खड्ड्यांतून प्रवास करत गाव गाठावे लागणार आहे.

कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी बोगद्यातील मुंबईहून गोव्याकडे जाणारी एक मार्गिका ११ सप्टेंबरपासून हलक्या वाहनांसाठी खुली होणार असल्याने वळणांचा घाट पार करण्यासाठी ४५ मिनिटाऐवजी १० ते १५ मिनिटांचाच अवधी लागणार असल्याने वाहनचालकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र, कशेडी घाटातही यंदाही गणेशभक्तांच्या मार्गात खड्डयांचे ‘विघ्न’ कायमच आहे. पोलीस यंत्रणाचीही डोकेदुखी कायम असून खड्डयांचे विघ्न पार करूनच यंदाही चाकरमान्यांना गाव गाठावे लागणार आहे. गणेशोत्सव अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला आहे. कशेडी बोगद्यातील एक मार्गिका ११ सप्टेंबरपासून खुली करण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान दिल्यानंतर बोगद्यातील अंतर्गत कामांनी घेतला आहे.

बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यानंतर वेळेच्या बचतीसह प्रवास सुस्साट अनू आरामदायी होणार असला तरी घाटातील मार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. यामुळे घाटांत छोटे-मोठे अपघातही सातत्याने घडत आहेत. त्यात भरीस भर म्हणून मुख्य वळणावर पडलेले खड्डे जीवघेणे ठरू लागले आहेत. गणेशोत्सव तोंडावर येवून ठेपला असतानाही खड्डे बुजवण्याची तसदी अद्यापही राष्ट्रीय महामार्ग खात्याने घेतलेली नाही. यामुळे चाकरमान्यांना खड्ड्यांतून प्रवास करत गाव गाठावे लागणार आहे.

११ सप्टेंबरपासून एक मार्गिका पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुली करण्याचे संकेत देण्यात आले असले तरी वाहतूक कितपत सुरू होईल, या बाबत सांशकताच व्यक्त केली जात आहे. यामुळे कोकणाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटातही जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे चाकरमान्यांना मनस्तापाचा प्रवास करावा लागणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कशेडी घाटात वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस केंद्रही उभारण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular