26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKhedऐन गणेशोत्सवात दिवसाढवळ्या खेडमध्ये घरफोडी, दागिने लंपास

ऐन गणेशोत्सवात दिवसाढवळ्या खेडमध्ये घरफोडी, दागिने लंपास

अज्ञात चोरट्याने धारदार हत्याराने कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

खेड शहरात ऐन गणेशोत्सवात बंद असलेले घर फोडून कपाटातील २ लाख १८ हज़ार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविली आहेत. शनिवारी दुपारी ही चोरी झाली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने शहरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून शहरात वास्तव्यास असलेले काहीजण उत्सवासाठी आपआपल्या गावी गेले आहेत. दादा महादेव देवरूखकर हे घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून पत्नी व मुलांसह बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने बंद घरातील सोन्याचे दागिने लांबवले.

अज्ञात चोरट्याने धारदार हत्याराने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात लॉकरमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले २ तोळे ८५० ग्रॅम वजनाचे व २ लाख १८ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. देवरूखकर कुटुंबीय घरी परतल्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लांबवल्याचे निदर्शनास येताच त्यांना धक्का बसला. पोलीस स्थानकात धाव घेत घरफोडीची तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत चोरट्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे

RELATED ARTICLES

Most Popular