23.6 C
Ratnagiri
Tuesday, February 24, 2026

लांजातील चार गावांना वादळी पावसाचा तडाखा

महाशिवरात्रीनंतर थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाली...

कोकणात १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन शिमगोत्सव, होळीसाठी ‘लालपरी’ सज्ज

मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना...

रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार ९.५ कोटींची ‘स्किल लॅब’

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भावी...
HomeRatnagiriदेवरूखमध्ये विवाहितेचा बाथरूमध्ये जळालेला मृतदेह आढळला

देवरूखमध्ये विवाहितेचा बाथरूमध्ये जळालेला मृतदेह आढळला

दरम्यान, या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख वरची आळी येथे एका ३० वर्षीय विवाहितेचा घराबाहेरील बाथरूममध्ये जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अक्षरा अरविंद मोहिते असे मृत विवाहितेचे नाव असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितलेः याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार, रविवार २१ डिसेंबर रोजी रात्री अक्षरा मोहिते या नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपल्या होत्या. सोमवारी २२ डिसेंबर रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुम ारास त्यांचा ७ वर्षांचा मुलगा आलोक याला जाग आली. त्यावेळी त्याला आई बिछान्यावर दिसली नाही. मुलाने घरातच राहणाऱ्या वडिलांच्या मावशी ताराबाई शिंदे यांना उठवले.

ताराबाई आणि आलोक यांनी घरात शोधाशोध केली, मात्र अक्षरा मिळून आल्या नाहीत. घाबरलेल्या मुलाने आणि ताराबाई यांनी शेजारी राहणारे काका दत्ताराम तुकाराम मोहिते यांना उठवून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वांनी मिळून पुन्हा शोध घेतला असता, घराबाहेरील बाथरूममध्ये अक्षरा या भाजलेल्या अवस्थेत आढळून आल्या. नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी घटनेची माहिती तात्काळ देवरुख पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अक्षरा यांना तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिक कायाप्रवासी देवान पोलीस त्यांना ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular