29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeRajapurराजापूरमध्ये अनुभवता येणार फुलपाखरू उद्यान

राजापूरमध्ये अनुभवता येणार फुलपाखरू उद्यान

रंगीबेरंगी फुलपाखरे पाहण्याची आणि त्याचा जवळून जीवनप्रवास अनुभवण्याची संधी राजापूरकरांना आता फुलपाखरू उद्यानाच्या माध्यमातून मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील कोंढेतड परिसरामध्ये येथील नगरपालिकेतर्फे फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले आहे. फुलपाखरू उद्यान हि संकल्पनाच अवर्णनीय आहे. पुणे येथे सुद्धा अशा प्रकारचे एक उद्यान उभारण्यात आले आहे. जेथे फक्त झाडांवरती विविध रंगी फुल्पखारेच दृष्टीस पडतात. अनेक वेळा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर मकरंद गोळा करताना आपण अनेक रंगीबेरंगी विविध आकाराची फुलपाखरे स्वच्छंद विहार करताना पाहतो. असे दृश्य पाहायला मिळणे म्हणजे एक प्रकारचे नेत्रसुखच. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच रंगीवेरंगी आकर्षक फुलपाखरांचे आकर्षण असते.

घरासह परिसरातील बागबगीचांमध्ये मुक्तपणे फुला-फुलांवरून फिरणार्‍या फुलपाखरांचे सार्‍यांनाच आकर्षण असते. रंगीबेरंगी पंखांचे सुंदर फुलपाखरू पाहिल्यानंतर सार्‍यांच्याच तोंडू व्वा, सुंदर, निसर्गाची अप्रतिम किमया असेच उत्साहवर्धक शब्द बाहेर पडतात. त्यामुळे फुलांवरून मुक्तपणे फिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे पाहण्याची आणि त्याचा जवळून जीवनप्रवास अनुभवण्याची संधी राजापूरकरांना आता फुलपाखरू उद्यानाच्या माध्यमातून मिळणार आहे.

सुमारे एक हजार स्क्वेअर फूटाचे क्षेत्र असलेल्या या उद्यानामध्ये विविध प्रकारच्या सुमारे तीनशे झाडांची लागवड करण्यात आली आहे. फुलपाखरांना आवडणार्‍या झाडांची लागवड करण्यास प्राधान्य दिल्याची माहिती पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षक श्रेया शिरवडकर यांनी दिली. राजापूर पालिकेच्या या उद्यानाच्या निर्मितीबाबत अनेक रंगीबेरंगी संकल्पना आहेत. त्यासाठी  फुलपाखरांना आवडणार्‍या ३०० झाडांची लागवड करण्यात आली आहे.

त्यामुळे फुलझाडांची जस जशी वाढ होत जाईल त्याप्रमाणे फुलपाखरे त्यावर विहार करायला येतील. कोकणात दाखल होणार्या पर्यटकांसाठी सुद्धा हि एक अभूतपूर्व पर्वणीच ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular