27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriतीन लाखांच्या केबलची चोरी शहरातील सेवा ठप्प - तीन संशयितांना अटक

तीन लाखांच्या केबलची चोरी शहरातील सेवा ठप्प – तीन संशयितांना अटक

शहर परिसरातील बीएसएनएल कंपनीची ३ लाख २१ हजार ३८१ रुपयाची भूमिगत टेलिफोन केबल चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. यावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला होता. या घटनेमुळे बीएसएनएलची शहरातील सेवा तीन दिवस ठप्प झाली होती. या प्रकरणी कंपनीने तक्रार दिल्यानंतर तिघा संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली. अब्दुल मदारसाब मुल्ला (वय ४१, रा. खालचा फगरवठार, मूळ- काटा मार्केट – विजापूर, कर्नाटक), मन्नू ऊर्फ रामस्वरूप पटेल (वय ४५, रत्नागिरी, मूळ रा. ग्रामभाटिया, ता. मैजियाद, जि. सतना, मध्य प्रदेश), युवराज बाळू गोसावी (रा. खडपेवठार झोपडपट्टी, रत्नागिरी, मूळ- विक्रमनगर- कागल, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हा प्रकार १४ ते १५ जूनला सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आला. संशयितांनी जेलनाका ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरातील ५१ हजार ९०० रुपये किमतीची १० मीटर लांबीची काळ्या रंगाची १२०० पेअरची केबल, १ लाख २९ हजार ७५० रुपये किमतीची २५ मीटर लांबीची काळ्या रंगाची बाराशे पेअरची केबल व ८६ हजार ९२५ रुपये किमतीची सुमारे ८० मीटर लांबीची काळ्या रंगाची ४०० पेअरची केबल; तसेच ९०६ रुपये किमतीची ५ मीटर लांबीची काळ्या रंगाची ५० पेअरची केबल, अशी सुमारे ३ लाख २१ हजार ३२१ रुपयांची केबल चोरून नेली होती. या प्रकरणी नंदकुमार कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

तपास पोलिस उपनिरीक्षक बी. डी. वनवे करत होते. संशयित म्हणून पोलिसांनी मुल्ला याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेला काही मुद्देमाल जप्त करण्यात आला. उर्वरित मुद्देमाल त्याने संशयित युवराज गोसावी याला विक्री केल्याचे तो सांगत आहे; मात्र गोसावी याने हा मुद्देमाल कोल्हापूर येथे विकला असून, कोणास दिला याबद्दल तो सांगत नाही. पोलिसांनी तीन संशयितांना आज अटक केली आहे. न्यायालयाने यातील मन्नु पटेल याला न्यायालयीन कोठडी सुनावली, तर अब्दूल मुल्ला व युवराज गोसावी यांना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular