21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeMaharashtraदिवा विझताना मोठा होतो हे आज पुन्हा दिसले राउतांचे रि-ट्वीट

दिवा विझताना मोठा होतो हे आज पुन्हा दिसले राउतांचे रि-ट्वीट

अल्टिमेटम् देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती. त्यांनी थेट दहशतवाद्यांना अल्टिमेटम दिले.

दादरमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेल्या सभेनंतर अनेक वाद विवाद झालेले दिसून आले. त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी ठाण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या उत्तर सभेमध्ये पवार कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. एका वृत्तपत्राचे संपादक असून देखील, संजय राऊत यांच्या शिवराळ भाषेवरूनही त्यांनी टीक केली. राज ठाकरेंच्या भाषणानंतर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेकांनी आपपल्या मनाप्रमाणे अर्थ घेऊन त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनीही रात्री उशिरा ट्वीट करत दिवा विझताना मोठा होतो हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र!” असं ट्वीट संजय राऊतांनी केलं.

पुढे बोलताना सुद्धा ते म्हणाले, तुमची अक्कल दीड वर्ष ईडी कार्यालयात गहाण पडली होती. आता तुमचे म्हसोबा बदलले. अभय मिळाल्याने तुमचा भोंगा वाजतोय, अशा शब्दांत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणावर बोचरी टीका केली आहे.

तुम्ही शेंदूर लावून घेतला,  मात्र आमचा बाणा अजूनही तोच आहे. तसेच अल्टिमेटम् देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती. त्यांनी थेट दहशतवाद्यांना अल्टिमेटम दिले. यांचे कसले आलेत अल्टिमेटम्स, असा सवाल करतानाच, हे सारे ते केवळ वैफल्यातून करत असल्याचेही राऊत म्हणाले. तुम्ही एका द्वेषातून बोलता आहात, तुमच्या तोंडाला कोणी तरी भोंगा लावला आहे. आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यांचा बाणा प्रखर हिंदुत्ववादाचा असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

संजय राउतांच्या ट्वीटनंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील री-ट्वीट करत संजय राऊतांच्या ट्वीटला समर्पक उत्तर दिलं आहे. “संपादक जेलमध्ये जाणार म्हणून भर पत्रकार परिषदेत शिव्या घालतो ही नवी म्हण आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

RELATED ARTICLES

Most Popular