26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeKhedखेडमध्ये चाकरमान्यांची कार उलटली ५ जखमी, दोघांची प्रकृती अत्यवस्थ

खेडमध्ये चाकरमान्यांची कार उलटली ५ जखमी, दोघांची प्रकृती अत्यवस्थ

अपघात इतका भीषण होता की कार उलटून रस्त्याच्या कडेला फेकली गेली.

मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील आंबवली येथे आपल्या गावी येणाऱ्या चाकरम ान्यांच्या कारला मोठा अपघात झाला आहे. खेड तालुक्यात महाळुंगे येथे हा अपघात झाला. कार अपघातात कारमधील पाच सहा प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये दोन महिलांसह एका युवकाचा समावेश आहे. हा अपघात बुधवारी १२ जून रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास झाला. चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिके अंदाज आहे. नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली.

या अपघातामध्ये कारमधील वैभव संपत चिकणे वय १२ वर्ष, दीक्षा संपत चिकणे वय १७ वर्ष, विश्वास भिकाजी कदम वय ४२ वर्ष, दीपक रमेश कदम वय ४०, मालती रमेश कदम वय ३५ हे जखमी झाले, यातील दोघाजणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळंबनी उपजिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. तसेच अधिक उपचारासाठी सर्व जखमींना मुंबई येथे हलवण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली. सर्व जखमी हे नांदिवली या गावातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात जखमींना तात्काळ दाखल करण्यात आले.

हा अपघात इतका भीषण होता की कार उलटून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यामुळे कारमधील प्रवासी जखमी झाले. या अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांनी तात्काळ मदत करून जखमींना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले. मात्र दोन जणांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular