28.9 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriबनावट आधारकार्डाद्वारे बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवल्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा

बनावट आधारकार्डाद्वारे बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवल्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा

किती वर्ष हा प्रकार सुरू होता याची चौकशी पोलीस करत आहेत.

कौशल्य विकास केंद्रात बनावट आधारकार्डाद्वारे बोगस विद्यार्थी बनावट आधारकार्डाद्वारे बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवल्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा बसवल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात प्राचार्यांसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारामुळे शासनाची फसवणूक झाली असून किती वर्ष हा प्रकार सुरू होता याची चौकशी पोलीस करत आहेत. शासनाकडून रत्नागिरीत चालवल्या जाणाऱ्या या कौशल्य विकास केंद्रांमध्ये बोगस प्रशिक्षणार्थी बसवून परिक्षा घेतल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

चक्क शासनाच्या कौशल्य विकास केंद्रात असे रॅकेट कार्यरत झाल्याने शासनाचा कौशल्य विकासाचे स्वप्न सफल होणार कसे? असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे. याप्रकरणी अ.भा.वि.प.चे पदाधिकारी आणि जागरूक नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी मंगळवारी हा प्रकार उघडकीस आणला. अ.भा.वि.प.ने स्थानिक पोलीसांकडे याबाबत लेखी निवेदन दिले आहे. त्यांनतर शहर पोलीसांचे पथक कौशल्य विकास केंद्रात दाखल झाले होते.

पोलीसांनी तेथे परिक्षेला बसलेल्या प्रशिक्षणार्थीची माहिती संकलीत केली. हा प्रकार गंभीर असल्याने सुमित मिलिंद पाध्ये (वय १९) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी कौशल्य विकास केंद्राच्या प्राचार्या रचना व्यास, केंद्राचे डीन अमोल गोठकडे, श्रीनिवास माने, श्वेता खानविलकर, फहीम नाझीम शेळके, नेहा नितीन कांबळे, प्रियांका रमेश चव्हाण व अज्ञात १ असे मिळून आठजणांविरूद्ध भा.दं.वि.क. ४२०, ४६५, ४६८, ४७१, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आता नवनवीन माहिती पुढे येऊ लागली आहे. त्याची जबाबदारी आमची नाही तर परीक्षा विभागाची आहे तर काहीजणं सांगतात हे केंद्र जे चालवतात त्या संस्थेचीच सर्वस्वी जबाबदारी आहे, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर फसवणुकीची जबाबदारी कोणाची यावरुन आता तू-तू मै-मै सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular