30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...
HomeRatnagiriहापूसवर फूलकिडीच्या प्रादुर्भावाची शक्यता, वातावरणात बदल

हापूसवर फूलकिडीच्या प्रादुर्भावाची शक्यता, वातावरणात बदल

पुढील आठवड्यात तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

वातावरणातील बदलांमुळे हापूस आंबाबागेत फूलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आंबा गर्दनिळ्या रंगाचे चिकट कागद किंवा कार्डबोर्ड सापळे लावून औषध फवारणी वेळेत करावी, अशा सूचना कोकण कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकानुसार, पुढील आठवड्यात तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत हापूस आंबाफळांची गळ होण्याची शक्यता आहे. ती कमी करण्यासाठी आणि फळाची प्रत सुधारण्यासाठी औषध फवारणी आवश्यक आहे. कमाल तापमानात वाढ संभवत असल्यामुळे वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांच्या अवस्थेतील आंबाफळांची गळ कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रतिझाड किंवा १५ दिवसातून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रतिझाड दिले पाहिजे. या प्रमाणात फळे वाटाणा आकारापासून ते सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंबापिकावर तुडतुड्यांची पैदास होण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे.

वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंबापिकावर फूलकीडीचा प्रादुर्भाव मोहोर व फळांवर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. ही कीड आकाराने सुक्ष्म असल्याने डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. या कीडीची पिल्ले आणि प्रौढ पाने, मोहोर, कोवळे दांडे आणि फळावरील साल खरवडून त्यातून पाझरणारा रस शोषून आपली उपजीविका करतात. कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळे तो भाग काळा पडतो. मोहोर काळा पडून गळून पडतो. त्या कीडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी फवारणी करावी लागते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास दोन फवारण्या कराव्यात. बागेतील फूलकीड नियंत्रणासाठी बागेत गर्दनिळ्या रंगाचे चिकट कागद किंवा कार्डबोर्ड सापळे लावावेत. मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी.

काजूवर ढेकण्या कीडीचा प्रादुर्भाव – काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या कीडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कीड पालवीतील रस शोषून घेते, त्यामुळे नवीन पालवी सुकून जाते. असे असल्यास नियंत्रणासाठी काजू मोहोर अवस्थेत असताना औषध फवारणी करावी. फवारणी करताना पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी सूचना केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular