22.7 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriडाक सेवकाचा लाखोंचा अपहार, गुन्हा दाखल

डाक सेवकाचा लाखोंचा अपहार, गुन्हा दाखल

चरवेली परिसरातील ५२ खातेदारांकडून २५ लाख १३ हजार २१३ रुपये घेऊन ते खातेदारांच्या खात्यात न भरता अपहार करत फसवणूक केली.

रत्नागिरी तालुक्यातील अनेक ठिकाणी आर्थिक फसवणुकीच्या घटना घडताना दिसत आहेत. कोरोना काळामध्ये घसरलेली आर्थिक स्थिती सध्या संसर्ग कमी झाल्याने पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बँक आणि पोस्टाच्या व्यवहारामध्ये पुन्हा आर्थिक उलाढाल पूर्वीप्रमाणे सुरु झाली आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये अशा आर्थिक अपहार केल्याच्या घटना आता डोके वर काढू लागल्या आहेत.

तालुक्यातील चरवेली येथे पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असणाऱ्या डाक सेवकाने पदाचा गैरवापर करत ५२ खातेदारांचे २५ लाख १३ हजार २१३ रुपये घेऊन ते खात्यात न भरता फसवणूक केली आहे. याप्रकरणी डाक सेवकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ ऑक्टोबर २०१० ते ७ मे २०२२ या कालावधीत घडली असून, खात्यात नवीन व्यवहार करताना हि गोष्ट लक्षात आली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डाक सेवकाचे नाव सचिन शशिकांत पवार रा. चरवेली, रत्नागिरी असे आहे. त्याच्या विरोधात गणपत सीताराम राणे वय ५७, रा. लांजा, रत्नागिरी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, चरवेली येथील डाकघर शाखेत डाक सेवक असलेल्या सचिन पवारने आपल्या पदाचा गैरवापर केला. त्याने चरवेली परिसरातील ५२ खातेदारांकडून २५ लाख १३ हजार २१३ रुपये घेऊन ते खातेदारांच्या खात्यात न भरता अपहार करत फसवणूक केली. त्याने या पैशाचे काय केले, लोक्नाचे पैसे कशासाठी वापरले याचा पोलीस कसोसीने शोध लावत आहेत. या आर्थिक अपहाराच्या प्रकरणामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाल्याने सर्व पोस्ट खातेधारक धास्तावले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular