26.3 C
Ratnagiri
Tuesday, July 15, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeRatnagiriजिल्ह्यात ८ हजार ८४१ शेतकऱ्यांना मोफत वीज - मुख्यमंत्री बळीराजा योजना

जिल्ह्यात ८ हजार ८४१ शेतकऱ्यांना मोफत वीज – मुख्यमंत्री बळीराजा योजना

योजनेचा कालावधी ५ वर्षांसाठी आहे.

नैसर्गिक दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीजयोजना २०२४चा मोठा आधार मिळणार आहे. जिल्ह्यातील ८ हजार ८४१ कृषिपंप ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे. ७.५ एचपीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला पुढील पाच वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे. जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमानामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला आहे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढली आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. त्यासाठी राज्यशासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. शासनाने ७.५ एचीपीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याचे जाहीर केले आहे.

एप्रिल २०२४ पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे. योजनेचा कालावधी ५ वर्षांसाठी आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत ही योजना राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे; मात्र ३ वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कृषिपंपधारक ८ हजार ८४१ शेतकरी आहेत. त्यांची थकबाकी ३ कोटी ३१ लाखएवढी आहे. शासनाच्या बळीराजा मोफत वीज योजनेचा या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. निसर्गाच्या फेऱ्यात आडकलेल्या शेतकऱ्याला चांगला आर्थिक हातभार लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular