25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeChiplunचिपळूणात वन विभागाकडून मगरीचे रेस्कू, सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्तता

चिपळूणात वन विभागाकडून मगरीचे रेस्कू, सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्तता

चिपळूण शहराजवळ शंकरवाडी येथील नागरी वस्तीमध्ये रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास १२ फूटांची अजस्त्र मगर आढळून आल्याची माहिती वन विभागास मिळाली.

चिपळूण शहरामध्ये नद्यांमध्ये मगरीचे साम्राज्य आहे हे सर्वज्ञातच आहे. लोक वस्तीत देखील आता मगरींचे सर्षण होऊ लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिपळूण मध्ये महापुराची परिस्थिती उद्धभवलेली तेंव्हा सुद्धा त्या पाण्यामधून मगरींचे वास्तव्य नजरेस आले होते. चिपळूण मध्ये सध्या नद्यांचा गाळ उपसा सुरु असल्याने मगरी बाहेर रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता सुद्धा भर वस्तीत मगरींचे वास्तव्य जाणवू लागल्याने लोक भयभीत झाली आहेत.

चिपळूण शहराजवळ शंकरवाडी येथील नागरी वस्तीमध्ये रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास १२ फूटांची अजस्त्र मगर आढळून आल्याची माहिती वन विभागास मिळाली. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मगर पिंजऱ्यात बंदिस्त केली आणि तिची सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली आहे.

पिंजऱ्यात पकडण्यात आलेली मगर साधारण १२ फूट लांब व अंदाजे ३०० किलोग्रॅम वजनाची असून ती मादी जातीची आहे. तिचे वय अंदाजे ३४  ते ४० वर्षाच्या दरम्यान असावे,  असे वन विभागाचे रेस्क्यू पथकाने सांगितले आहे. या रेस्क्यू ऑपरेशन वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण राजेश्री कीर, विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदशनाखाली वनरक्षक सुर्वे, वनपाल रामदास खोत व वाहनचालक नंदू कदम यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. वस्तीमध्ये शिरकाव केलेल्या अजस्त्र मगरीला वेळीच वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी येऊन पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. त्याचप्रमाणे आलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एवढ्या पहाटे सुद्धा कार्यतत्परता दाखविल्याबद्दल नागरिकांनी आभार देखील मानले.

RELATED ARTICLES

Most Popular