26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeChiplunचिपळूणातील ड्रग्ज प्रकरण अमर लटकेला पुन्हा अटक

चिपळूणातील ड्रग्ज प्रकरण अमर लटकेला पुन्हा अटक

एक दिवसाची पोलिस कोठडी १ मिळाली व त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.

चिपळूणात गांजा प्रकरणी पोलिसांची धरपकड सुरू आहे. आतापर्यंत चिपळूण पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून गांजा विक्रेता बॉडीबिल्डर अमर चंद्रकांत लटके याला पुन्हा एकदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर आणखी एकाला अटक करण्यात आली असून ही साखळी दिवसेंदिवस वाढत निघाली आहे. चिपळूणात ४ तरूण गांजा ओढताना विरेश्वर कलनी नजिक सापडले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. या तरूणांनी आपण गांजा संशयीत आरोपी अमर लटके यांच्याकडून आणल्याचे सांगितल्यानंतर जिम व्यावसायीक बॉडीबिल्डर अमर लटके याला अटक झाली. यानंतर त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी १ मिळाली व त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.

मात्र याच दरम्यान धरपकड सुरू असताना संशयीत आरोपी विजय शांताराम राणे (५६, मुरादपूर भोईवाडी), ओंकार सुभाष कराडकर (२६, टेरव कुंभारवाडी) यांना गांजा सेवन केल्याप्रकरणी अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अमर लटके याच्याकडून ८ दिवसांपुर्वी गांजा खरेदी केल्याचे सांगितले. यानंतर जामिनावर सुटलेला अमर लटके याला पुन्हा सोमवारी सायंकाळी ४ वाजता ताब्यात घेऊन अटक केली असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले. याशिवाय रविवारी रात्री शहरात गस्त सुरू असताना अमीर उमर शेख (२३, मुरादपूर मिठागरी मोहल्ला) याला गांजा सेवन प्रकरणी अटक केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular