28.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...

रत्नागिरी पालिकेत ५५ कंत्राटींना डच्चू…

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी पालिकेने आर्थिक शिस्त...

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...
HomeChiplunविस्तार अधिकार्‍याने केली बचतगट महिलांची लाखोंची फसवणूक

विस्तार अधिकार्‍याने केली बचतगट महिलांची लाखोंची फसवणूक

विस्तार अधिकारी यांनी बचत गटातील महिलांची ६ लाखाहून अधिक रुपयाची फसवणूक केल्याचे वृत्त समोर आले आहे.

चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा सभापती रिया कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये विस्तार अधिकारी यांनी बचत गटातील महिलांची ६ लाखाहून अधिक रुपयाची फसवणूक केल्याचे वृत्त समोर आले आहे. अनेक ठिकाणी अशा फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चिपळूण पंचायत समितीची सभा चांगलीच गजाली असून, वातावरण तंग झालेले दिसून आले आहे.

बचत गटाच्या महिलांकडून विस्तार अधिकार्‍याने २० ते २५ हजारांच्या पावत्या घेतल्या. मात्र, प्रत्यक्षात त्यांना केवळ १० ते १५ हजारच त्यांच्या हातावर टेकवले.  काही गटांना तर पैसेच मिळालेले नाहीत, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. प्रशिक्षण देणार्‍या अधिकार्‍यांचेही अनुदान त्या अधिकार्‍याने लाटले आहे. काही ग्रामपंचायतींनी तर ग्रामनिधीतून बचत गटांचे पैसे पूर्ण दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या संबंधित विस्तार अधिकार्‍यांनी ६ लाखाहून अधिक पैसे लाटून अनेक महिला बचत गटांची फसवणूक केली. यावरून चिपळूण पंचायत समितीच्या सभेत आरोप-प्रत्यारोप झाल्याने, सभेत चांगलेच वातावरण तापले होते. यावेळी बीडीओ प्रशांत राऊत, उपसभापती प्रताप शिंदे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

या सर्व प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन बीडीओ प्रशांत राऊत म्हणाले कि,  या चौकशीची जबाबदारी सहायक गटविकास अधिकार्‍यांवर सोपवली होती. मात्र, सध्या त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे ते सभेला अनुपस्थित आहेत. प्रशिक्षण झालेल्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीकडून देखील खुलासा मागविण्यात आला आहे. मात्र तो अद्याप हाती मिळालेला नाही. यापुढे मी स्वतः १५ दिवसांत चौकशी करून त्याचा अहवाल देतो.

RELATED ARTICLES

Most Popular