28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

सिलेंडरच्या स्फोटात संगमेश्वरातील कुटुंबावर मोठा घाला

कोल्हापूर येथे ही दुर्घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी...

धावत्या रेल्वेतून उतरणे तरूणाच्या आले अंगाशी…

अति घाई आणि संकटात नेई, असे म्हणतात....

कडवई पाझर तलावाचे काम १८ वर्षे लोटली तरी अर्धवट

कडवई घोसाळकर कोंड येथील पाझर तलावाचे काम...
HomeChiplunचिपळूण उड्डाणपुलाच्या 'गर्डर'चे काम मंदावले

चिपळूण उड्डाणपुलाच्या ‘गर्डर’चे काम मंदावले

साधारण या पुलाची लांबी १८४० मीटर, तर रूंदी ४५ मीटर इतकी आहे. या पुलाचे ४६ पिलरचे काम पूर्णत्वास गेले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणातील सर्वाधिक १.८० किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे गर्डर बसवण्याचे काम एप्रिलपासून सुरू आहे. पावसाळ्यातही हे काम सुरू ठेवले आहे; मात्र गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने या कामाची गती पूर्णतः मंदावली आहे. शहरातील बहादूरशेख नाका ते युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पुढेपर्यंत हा पूल उभारला जाणार आहे. साधारण या पुलाची लांबी १८४० मीटर, तर रूंदी ४५ मीटर इतकी आहे. या पुलाचे ४६ पिलरचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यानंतर आता सर्व्हिस रोडसह गर्डरच्या कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. गर्डरच्या कामासाठी अत्यावश्यक असलेली महाकाय यंत्रणा बहादूरशेखनाका येथे दाखल झाल्यानंतर त्या द्वारे एप्रिल महिन्यात गर्डरच्या कामाची चाचणी घेतली.

सुमारे ८०० गर्डर या पुलावर उभारले जाणार आहेत. त्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली. एकूण ४६ पिलरसाठी कोंडमळा येथे तयार स्थितीत असलेले ८० टनी गर्डर ४८ चाकी हायड्रोलिक ट्रेलरने येथे आणून १५० टनी क्रेनच्या साहाय्याने बसवले आहेत. आतातपर्यंत दोन पिलरदरम्यानचे गर्डर बसवून झाले आहेत; परंतु एकूण कामाचा वेग लक्षात घेता अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे. येथे गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे या कामाची गती खूपच मंदावली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात लांब पल्ल्याच्या उड्डाणपुलाच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. एकापाठोपाठ एक गर्डर उभारण्याचे काम केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular