26.4 C
Ratnagiri
Thursday, April 25, 2024

माझ्या जीवात जीव असेपर्यंत काम करत राहणारः सुनिल तटकरे

निवडणूका येतात जातात, मात्र आम्ही जनतेच्या कामासाठी...

अमित कदम यांचा राष्ट्रवादी पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश

महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीकृष्ण हॉल, नायगाव...

…तर बेरोजगारी कशी दूर होणार, प्रमोद जठार

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये...
HomeChiplunक्रेडीट कार्ड वैधता वाढवून देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक

क्रेडीट कार्ड वैधता वाढवून देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक

ऑनलाईन फसवणूक, फेक फोन कॉल्स, विविध आमिषे दाखविणाऱ्या स्किम्स, बक्षिसे लागणे इत्यादी अनेक प्रकारच्या गोष्टींमुळे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. चिपळूण मध्ये अशीच एका इसमाची क्रेडीट कार्ड वैधता वाढवून देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे.

क्रेडिट कार्डाची वैधता वाढवून देतो या  बहाण्याने विश्वास संपादन करून चिपळूण गोवळकोट येथील राहणारे शमशुद्दीन परकार यांची १ लाख ६० हजाराची ऑनलाईन फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी शमशुद्दीन परकार हे गोवळकोट चिपळूण येथे राहतात. त्यांनी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.

राधिका शर्मा नावाच्या महिलेने त्यांच्या मोबाईलवर फोन करून आपण आयसीआयसीआय बँकेच्या मुंबई येथील बोरीवली शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. आपल्या क्रेडिट कार्डाचे लिमिट वाढवून देण्यासाठी फोन केला आहे असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर डेबिट कार्डचा नंबर व ओटीपी नंबर मागून घेऊन फिर्यादी परकार यांच्या खात्यातील सुरुवातीला ९५  हजार व त्यानंतर ६५ हजार असे एकूण एक लाख साठ हजार रुपये काढून घेतले.

पैसे काढल्याचा मेसेज मोबाईलवर आला असता, फेक कॉलद्वारे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच फिर्यादी परकार यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारच्या कॉल्सना किंवा बक्षिसांच्या भूलथापांना बळी पडू नका असे वारंवार बँक आणि पोलिसांमार्फत सांगितले जाते. ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याबाबत पोलीस कायम जागरुकता पसरवत असतात. परंतु, वुद्ध, विद्यार्थी, यांनाच टारगेट करून अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडवण्यात अज्ञात गुन्हेगार यशस्वी ठरतात.

RELATED ARTICLES

Most Popular