28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeMaharashtraसीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

उच्च तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाची समोर आली आहे. सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च तंत्रशिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ४ ते ११ मे दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. उच्च तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार नाही, असेही विभागाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

मागील वर्षी सुद्धा कोरोनाच्या संकटामुळे परीक्षांच्या वेळांमध्ये अनेक वेळा बदला करण्यात आलेला. या नव्या मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना उच्च तंत्र शिक्षण विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटी-२०२२, एमबीए/ एमएमएस सीईटी २०२२, एमसीए सीईटी २०२२, एम.आर्च सीईटी २०२२, एम.एचएमसीटी या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे दिलेल्या ठराविक कालावधीपर्यंतच्या वेळेचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा.

तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे राहणार आहे. एमएचटी सीईटीतील पीसीएम ग्रुपची परीक्षा ही ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तर पीसीबी ग्रुपची परीक्षा ही १२ ते २० ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तर एमबीए / एमएमएसच्या परीक्षा २३, २४ आणि २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. एमसीएच्या ४ आणि ५ ऑगस्ट तर बीएचएमसीटीची परीक्षा ही २१ ऑगस्टला होणार आहे. एम एचएमसीटी २ ऑगस्ट , एम आर्चची परीक्षा २ ऑगस्ट रोजी होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular