24.5 C
Ratnagiri
Tuesday, December 16, 2025

गुहागर किनारा ‘ब्लू फ्लॅग’च्या अंतिम टप्प्यात…

गुहागर आयोजित किनारी वाळूशिल्प प्रदर्शनावेळी विचारे आणि...

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची गैरसाय लांजा नगरपंचायतीला निवेदन

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी संदर्भात भाजपचे...

एलईडी मासेमारी करणाऱ्या २ नौका गस्ती पथकाने पकडल्या

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी...
HomeChiplunसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जीएसटीतून दिलासा मिळण्याची मागणी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जीएसटीतून दिलासा मिळण्याची मागणी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जीएसटी नोंदणीचे बंधन नाही. मग त्यांनी जीएसटीचा भूर्दंड का सहन करावा,

मागील दोन वर्षानंतर कोरोनामुळे राज्यातील अनेक सार्वजनिक मंडळांसकट चिपळुण मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आर्थिक स्थिती देखील बिघडली आहे. यात वाढत्या जीएसटीमुळे आणखी पिळवणूक होत आहे. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य नित्यानंद भागवत यांनी गणेशोत्सवावर जीएसटीच्या रुपाने आलेले विघ्न दूर करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. काहीच दिवसावर गणपती आले आहेत, मात्र वाढती महागाई आणि संबंधित वस्तूंवर लागू झालेला वस्तू आणि सेवा कर यांचा भार कसा सोसायचा असा प्रश्न बहुतांश मंडळांना पडला आहे. त्यामुळे सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून जीएसटी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. सजावट, मंडपाविना सार्वजनिक उत्सव साजरा करता येत नाही. सजावट, विद्युत रोषणाई, मंडप, फलक आदी सेवांवर १२ ते १८ टक्के जीएसटी आकारला जात असल्याने, गणेशोत्सव मंडळाच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. हा खर्च आम्ही भक्तांनी स्वहखुशीने दिलेल्या देणगीतून भागवतो.  त्यामुळे जीएसटीची एवढी वाढीव रक्कम भरणे शक्य नाही. शासनाने यामध्ये आम्हाला सूट द्यावी. सणांवर अशाप्रकारे जीएसटी लावली गेली तर यापुढे असे उत्सव साजरे करताना मर्यादा येणार आहेत. दोन वर्षांनंतर मुक्त वातावरणात सण साजरे करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे शासनाकडून सवलत मिळाली पाहिजे. अशी सर्व स्तरातील नागरिकांनी मागणी केली आहे.

गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द केल्यास सार्वजनिक मंडळांवरील आर्थिक भार कमी होईल. बचतीची रक्कम मंडळांना उत्सवकाळात लोकोपयोगी उपक्रमांसाठी खर्च करता येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जीएसटी नोंदणीचे बंधन नाही. मग त्यांनी जीएसटीचा भूर्दंड का सहन करावा, असा प्रश्नही सार्वजनिक मंडळाकडून उपस्थित करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular