28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...

रत्नागिरी पालिकेत ५५ कंत्राटींना डच्चू…

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी पालिकेने आर्थिक शिस्त...

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...
HomeChiplunचिपळुणला वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने तासभर चांगलेच झोडपले

चिपळुणला वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने तासभर चांगलेच झोडपले

पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते.

वादळी वारे, विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट करत अचानक आलेल्या पावसाने रविवारी चिपळूणला तासभर चांगलेच झोडपून काढले. मुसळधार पडलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र दिसू लागले.तर वातावरणात देखील गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी ६ नंतर पावसाचा जोर कमी झाला. गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढला होता. ऑक्टोबर हिट ने सर्वजण हैराण झाले होते. बहुदा पावसाने एझिट घेतली असाच अंदाज व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान भात पिके देखील तयार झालेली असल्याने शेतकरी भात कापणीच्या कामाला लागले होते.

कडकडीत ऊन पडत असल्याने भात कापून सुकण्यासाठी जागोजागी पसरवून ठेवण्याचे काम सुरू असतानाच रविवारी सायंकाळी ५ वाजता अचानक वातावरण बदलले. एका बाजूने वादळी वारे सुरू झाले, काळाकुट्ट अंधार पडू लागला आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजांच्या लखलखाटामुळे भीतीचे वातावरण निर्माण  झाले आणि काही वेळेतच जोरदार अशा पावसाला सुरुवात झाली. तासभर मुसळधार पाऊस कोसळला. चिपळूण शहर आणि ग्रामीण भाग असा सर्वत्र पाऊस पडला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. तर वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. ढगांचा गडगडाट सुरू होताच वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

RELATED ARTICLES

Most Popular