23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriसावकारी परवान्यासाठी लाच स्विकारताना लिपिकाला पकडले

सावकारी परवान्यासाठी लाच स्विकारताना लिपिकाला पकडले

५० हजाराची लाच स्वीकारताना पकडल.

सावकारी परवान्याचे (लायसन्स) काम करून देण्यासाठी ५० हजारांची लाच स्विकाताना एका लिपिकाला रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. गुरूवार ११ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. विनायक रामचंद्र भोवड (५७ वर्षे, मुख्य लिपिक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्थां तथा सावकारांचे निबंधक रत्नागिरी, रा. स्वामी’ त्रिविक्रम नगर, कसोप सडा, ता. जि. रत्नागिरी (वर्ग-३) असे रंगेहाथ पकडलेल्या संशयीत आरोपीचे नाव असल्याची माहिती लाचरुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देताना दिली.

अधिक वृत्त असे की, संशयित आरोपी विनायक रामचंद्र भोवड हा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्थेचा मुख्य लिपिक असून त्याने तक्रारदाराच्यो सावकारी लायसन्सचे काम करून देण्यासाठी २६ जून रोजी स्वतःसाठी व उपनिबंधक ऑफिसला देण्यासाठी ५०,००० रुपयांची लाच मागितली होती. लाच म्हणून ५०,००० रुपये स्विकारताना ११ जुलै रोजी दुपारी ११:५६ वाजता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक ९ रत्नागिरी कार्यालयात विनायक रामचंद्र भोवड याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुरुवारी सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

आरोपीला पडण्यासाठी पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, सपोफौ संदीप ओगले, पोहवा संतोष कोळेकर, पोहवा विशाल नलावडे, पो.ना. दिपक आंबेकर, पो.कॉ. हेमंत पवार, पो.कॉ. राजेश गावकर यांनी सापळा रचला. सापळा पर्यवेक्षण अधिकारी महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र तसेच मार्गदर्शन अधिकारी सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली. तपासी अधिकारी म्हणून अनंत कांबळ (पोलीस निरीक्षक, अतिरिक्त पदभार, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो २ रत्नागिरी) यांनी काम केले.

RELATED ARTICLES

Most Popular