31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी...
HomeRatnagiriकोकणी मेव्याला बदलत्या वातावरणाचा फटका

कोकणी मेव्याला बदलत्या वातावरणाचा फटका

कोकणाला नैसर्गिक आपत्तीचा शापच लागल्याचे चित्र अलीकडच्या दशकात निर्माण झाले आहे.

आता उन्हाळ्यामध्ये वणवे, बदलणारे वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट, वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे कोकणातील निसर्गसौंदर्य, शेती, फळबागा एवढंच नव्हे तर कोकणी रानमेव्यालाही याचा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका सध्या आंबा, काजू, कोकम, करवंद, जांभूळ, फणस आदी विविध फळपिकांना बसू लागला आहे. उत्पादनात घट होऊन हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याने येथील शेतकरी, बागायतदार आर्थिक कचाट्यात सापडू लागला आहे. कोकणाला नैसर्गिक आपत्तीचा शापच लागल्याचे चित्र अलीकडच्या दशकात निर्माण झाले आहे. अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन, दरड कोसळण्याच्या घटनांनी पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

कोकणातील शेतकरी आता भातशेती, आंबा, काजूबरोबरच आता भाजीपाला, कलिंगड, काकडी, पपई, केळी, सुपारी, नारळ यांचे उत्पादनही घेत आहे; मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे अलीकडच्या काही वर्षांत फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी असल्याने त्यातून सावरून पुन्हा उभं राहणे येथील शेतकरी, बागायतदारांसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे कोकणचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. कोकणची खरी ओळख आंबा, काजू, कोकम, करवंद, जांभूळपिके आहेत. कोकणात आंबा, काजू पिकांखाली हजारो हेक्टरने क्षेत्र वाढले याशिवाय कोकम, जांभळासारख्या फळपिकांचीही लागवड होऊ लागली आहे; मात्र कोकणातील शेतकऱ्यांना ऋतूचक्र बदल्याने आणि वणव्यांचे प्रमाण वाढल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

काळी मैना अन् जांभूळ दिसेनासी – कोकम, जांभूळ, करवंद या पिकाचेही उत्पादन रोडावले आहे. काही ठिकाणी कोकम पीक मिळत असले तरी ते अत्यल्प प्रमाणात आहे. कोकणात एप्रिल, मे महिन्यात कोकणी रानमेवा खाण्यासाठी कोकणातील चाकरमानी गावागावांत येतात; मात्र यंदा कोकणची काळी मैना म्हणून ओळख असलेली करवंदं आणि जांभूळ दिसेनासी झाली आहेत. वणव्यात करवंदाच्या जाळ्या होरपळत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular