24.6 C
Ratnagiri
Saturday, September 21, 2024

सिद्धांत चतुर्वेदीने ॲक्शनने जिंकली मनं, ‘युध्रा’ची कथा

सिद्धांत चतुर्वेदी यांचा न पाहिलेला अवतार असलेला...

अश्विनचे शतक सहा बाद १४४ नंतर भारताची मजल ३३९ पर्यंत

रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी ६...
HomeMaharashtraमुख्यमंत्र्यांच्या कौतुकानंतर, एकच वादा, योगेश दादाच्या घोषणानी सभागृह दणाणला

मुख्यमंत्र्यांच्या कौतुकानंतर, एकच वादा, योगेश दादाच्या घोषणानी सभागृह दणाणला

दापोली मतदार संघाला योगेश कदम नावाचा योग्य लोकप्रतिनिधी मिळाला आहे.

आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने दापोली, खेड, मंडणगड या तिन्ही तालुक्यातून नूतन पदाधिकारी यांची नेमणूक मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले, ‘दापोली मतदार संघाला योगेश कदम नावाचा योग्य लोकप्रतिनिधी मिळाला आहे. योगेश तरुण आहेत, हुशार आहेत, निर्भिड आहेत. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाची जाण असणारा आमदार आहे, असे सूतोवाच करत माजी मंत्री रामदास कदम यांनी पक्षासाठी दिलेले योगदान फार मोठे आणि मोलाचे असल्याची पाठीवर कौतुकाची थाप दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी आधीच सांगितलं आहे, काळजी नको, अशा प्रकारे काम करायचं की मतदाराला योगेश कदम यांच्याशिवाय दुसरे नाव सुचताच कामा नये आणि तसे काम दापोली मतदारसंघात योगेश करत आहे. यापुढे दापोली मतदार संघामध्ये योगेश कदम नावाचा ब्रँण्ड होईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढताच एकच वादा, योगेश दादा अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले. या वेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी आमदार योगेश कदम, आमदार रवींद्र फाठक, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शशिकांत चव्हाण, अण्णा कदम आदी उपस्थित होते.

पदाधिकारी नेमणुकीसाठी आलेले कार्यकर्ते पाहून मी भारावून गेलो आहे. कोविडच्या काळात संकट आलं, आपत्ती आली तेव्हा योगेश कदमांनी खूप मदत केली आहे आणि हे सर्वांना माहिती आहे. योगेश हे लोकांमधील आमदार आहेत. त्यांना तळागाळातील सर्व समस्या माहिती आहेत आणि त्या सोडविण्यासाठी आमची सर्वांची साथ त्यांना नक्कीच असेल, असा विश्‍वासही त्यांनी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular