24.3 C
Ratnagiri
Saturday, September 21, 2024

सिद्धांत चतुर्वेदीने ॲक्शनने जिंकली मनं, ‘युध्रा’ची कथा

सिद्धांत चतुर्वेदी यांचा न पाहिलेला अवतार असलेला...

अश्विनचे शतक सहा बाद १४४ नंतर भारताची मजल ३३९ पर्यंत

रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी ६...
HomeRatnagiriकोकणात दिवाळीपूर्वीच राजकीय बॉम्ब फुटणार असल्याच्या चर्चा

कोकणात दिवाळीपूर्वीच राजकीय बॉम्ब फुटणार असल्याच्या चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर सतत आरोप करणारे कदमांना योग्यवेळी उत्तर देईन

गणेशोत्सवानंतर कोकणातील रामदास कदम आणि भास्कर जाधव हे दोन्ही नेते पुन्हा राजकीयदृष्ट्या अधिक सक्रीय होऊन आमनेसामने येण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे कोकणात दिवाळीपूर्वीच राजकीय बॉम्ब फुटणार असल्याच्या चर्चा होत आहेत. मातोश्रीच्या छत्रछायेखाली वाढलेले रामदास कदम हे ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विश्वासू आणि आक्रमक प्रवृत्तीचा नेता म्हणून रामदास कदम यांची ख्याती आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर मात्र त्यांना मातोश्री आणि ठाकरे कुटुंबीयांपासून दूर करण्याचा प्रयत्न मातोश्रीचे विश्वासू म्हणवणाऱ्यांनी केला. त्यांची ही खेळी लक्षात आल्यानंतर रामदास कदमांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु, पुढे मग दुरावाच येत गेला.

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांना सूचक इशारा दिला आहे. ते म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर सतत आरोप करणारे कदमांना योग्यवेळी उत्तर देईन, असे यांनी सांगितले होते; मात्र कदमांनी भास्कर जाधव यांच्यावरही निशाणा साधल्यानंतर दोघांमधील शाब्दिक द्वंद्व पुन्हा सुरू झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वर निशाना साधण्याची चांगलीच संधी रामदास कदमांना मिळाली आहे. त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी भास्कर जाधव यांच्यावर आहे. जाधवांची नेतेपदी निवड झाल्यानंतर आणि खेडच्या दौऱ्यात कदमांनी भास्कर जाधव यांना चिमटे काढले होते. त्यामुळे गुहागरच्या मेळाव्यात जाधवांनी कदमांचा समाचार घेतला. दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्षाला नव्याने सुरवात झाली आहे.

भास्कर जाधव विरुद्ध रामदास कदम राजकीय वैर तसे जुनेच आहे. जाधव शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. आघाडी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर या दोन नेत्यांमधील राजकीय युद्ध रंगले होते. गुहागर विधानसभा मतदारसंघात कदम विरोधी पक्षनेते असताना जाधवांनी त्यांचा पराभव केला. त्याचा राग त्यांच्या मनात अधिक होता; मात्र नंतरच्या काळात दोघांमधील राजकीय वैर संपले.

RELATED ARTICLES

Most Popular