29.8 C
Ratnagiri
Sunday, May 11, 2025

शहरातील धोकादायक इमारती हटवा; राजापूर न. प. प्रशासनाची इमारत मालकांना नोटीस

राजापूर शहर बाजारपेठेत रस्त्यालगत काही जुन्या इमारती...

राजकोटवरील शिवपुतळ्याचे आज पूजन…

मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती...

रत्नागिरीच्या नविन बसस्थानकाचे आज लोकार्पण

बराच काळ काम रेंगाळलेल्या रत्नागिरीच्या मध्यवर्ती एसटी...
HomeMaharashtraमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सक्त विश्रांतीचा सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सक्त विश्रांतीचा सल्ला

धावपळीने प्रचंड थकवा आल्यामुळे डॉक्टरांनी मुक्य्मंत्री एकनाथ शिंदेंना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

मागील महिन्यापासून राजकारणात झालेली उलथापालथ आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी केलेली बंडखोरी आणि अखेर मुख्यमंत्रीपदाची गळ्यात पडलेली माळ. सततचे दौरे आणि पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या सभा यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या तब्ब्येतीमध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले आहे. धावपळीने प्रचंड थकवा आल्यामुळे डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

गेल्या महिनाभरात रात्री-अपरात्री, लहान मोठे एक-दोन दिवसांचे, तर कधी उघड आणि कधी छुपे असे दिल्लीचे दौरे असोत, पंढरपूर वारी,  महाराष्ट्र दौरा यामुळे एकनाथ शिंदे यांच्या तब्ब्येतीवर त्याचा ताण आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक दिवस सक्तीचा आराम करण्याच्या सूचना दिली आहे. शिंदेंनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.

तर दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात निवडणूक चिन्हाबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला दिल्याने भाजप सावध पावलं टाकण्याच्या पवित्र्यात असल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांनीही आजचे सर्व कार्यक्रम तातडीने रद्द केले आहेत. फडणवीस पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांनी २० जूनला बंड पुकारल्यानंतर सुरत-गुवाहाटी-गोवा-मुंबई असे मार्गक्रमण करत अखेर मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. ३० जूनला मुंबईत येऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांचे सतत दौरे, सभा, भाषणं, पत्रकार परिषदा असे अधिक व्यस्त वेळापत्रक पाहायला मिळत आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ८ ऑगस्टला होणार असल्याची चर्चा आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगालाही तूर्तास कोणताही आदेश घेण्यास मनाई केल्याने शिंदे गट काहीसा बॅकफूटवर जाऊ शकतो. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार ठरलेल्या वेळी होणार की आणखी लांबणीवर पडणार, हे आता फडणवीसांच्या दिल्लीवारीत निश्चित होऊ शकते.

RELATED ARTICLES

Most Popular