30.6 C
Ratnagiri
Sunday, April 14, 2024

अजय देवगणने ‘मैदान’मध्ये केला अप्रतिम अभिनय

2019 मध्ये अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाची...

सिडकोला कोकणातून हद्दपार करणारच, खा. राऊतांचा निर्धार

गुजरातच्या उद्योगपतींना कोकण किनारपट्टी विकण्याचा कुटील डाव...

डिझेल विक्री बंद ठेवल्याने मच्छीमार संस्थांचा तोटा

पेट्रोलपंपावरून ९ येणाऱ्या टँकरद्वारे मिरकरवाडा बंदरावर अनधिकृतपणे...
HomeRatnagiriडिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर, पालकमंत्र्यांची माहिती

डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर, पालकमंत्र्यांची माहिती

१० डिसेंबरला ते येण्याची शक्यता असून, निश्‍चित तारीख दोन दिवसांमध्ये समजणार आहे.

महाविकास आघाडीला धक्का देत एकनाथ शिंदेंच्या सहकार्याने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीची सत्ता राज्यात आली. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौरा करतील, असे अपेक्षित होते. रत्नागिरीचे आमदार तथा विद्यमान पालकमंत्री उदय सामंत आणि खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्य शिलेदार आहेत.

डिसेंबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा होणार असून, त्यांच्या जंगी स्वागतासाठी कायकर्त्यांना तयारीत राहण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. २८) सायंकाळी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. १० डिसेंबरला ते येण्याची शक्यता असून, निश्‍चित तारीख दोन दिवसांमध्ये समजणार आहे. यावेळी रत्नागिरी शहरातील मुख्य विकासकामांची उद्‌घाटनेही होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री खेडमध्ये खासगी दौऱ्‍यावर येऊन गेले होते. तत्पूर्वी कोकणातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ते येतील, अशी अपेक्षा होती. आता हा दौरा डिसेंबर महिन्यात होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. सोमवारी ता. २८ सायंकाळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते पालकमंत्री सामंत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी १० डिसेंबरला मुख्यमंत्री रत्नागिरीत येण्याची शक्यता असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

सत्ता स्थापन झाल्यापासून ते प्रथमच रत्नागिरी दौऱ्‍यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तयारी सुरू करा, अशा सूचनाही दिल्या आहेत. या दौऱ्‍यात शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सभा आयोजित करण्यात येणार असून, माळनाका येथील तारांगणाचे उद्‌घाटन, लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे भूमिपूजन आणि शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. दौऱ्‍याच्या तारखेबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular