29.8 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRajapurराजापूरकरांसाठी “ही” गोष्ट ठरतेय डोकेदुखी

राजापूरकरांसाठी “ही” गोष्ट ठरतेय डोकेदुखी

पोलिस ठाण्यासमोरच्या भागामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची संख्या जास्त असते. तसेच सातत्याने या मार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे.

सर्वत्र सुरु असलेली महामार्गाची, आतील लहान रस्त्यांची कामे डागडुजी यामुळे सर्वत्र वाहतुकीची वानवा सुरु आहे. त्यासोबतच बेशिस्तपणे रस्त्यावरच अडथळा निर्माण होईल याप्रमाणे, पार्क केलेल्या गाड्या यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

राजापूर शहर विभागातील जवाहरचौक ते जकातनाका या दरम्यान रस्त्याच्या बाजूला अनेक वाहने पार्किंग केलेली असतात. त्यामध्ये पोलिस ठाण्यासमोरच्या भागामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची संख्या जास्त असते. तसेच सातत्याने या मार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये वाहतूकीची होणारी कोंडी ही नित्याचीच बाब ठरत आहे. वाहनचालकांसह संपूर्ण राजापूरकरांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे.

तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शहरामध्ये शहरासह ग्रामीण भागातील लोकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात ये – जा असते. त्यामुळे शहरामध्ये ग्रामीण भागासह इतर भागातून विविध कामा निमित्ताने प्रवास करणारी लोक खासगी चारचाकी,  दुचाकी गाड्यांचा वापर करतात. या गाड्या पार्किंग करण्यासाठी शहरामध्ये फारशी व्यवस्था नसल्याने वाहन धारकांकडून ही वाहने अनेकवेळा रस्त्याच्या बाजूला पार्किंग करून ठेवली जातात. त्यामध्ये जकातनाका ते जवाहचौक भागावर रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात.

अनेकवेळा ही वाहने नो पार्किंगच्या जागेमध्ये पार्किंग करून ठेवलेली दिसतात. त्यामध्ये गुरुवारच्या आठवडा बाजारच्या दिवशी तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाण्यासमोरील रस्ता येथे पार्किंग केलेल्या वाहनांची संख्या जास्त असते. दुतर्फा उभ्या केलेल्या वाहनांमुळे या ठिकाणीही अनेकवेळा वाहतूक कोंडी निर्माण होते.

जवाहरचौकातून एसटी डेपोकडे व एसटी डेपोकडून जवाहर चौकात ये-जा करणाऱ्या एसटी गाड्यांची वर्दळ सातत्याने कायम असते. आधीच अरुंद असलेल्या जकातनाका ते जवाहरचौक या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करून ठेवलेली वाहने असताना अशावेळी दोन एसटी गाड्या समोरासमोर आल्या तर वाहतूक कोंडी होती. ही वाहतूककोंडी वाहनचालकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular