31.7 C
Ratnagiri
Saturday, April 20, 2024

कोकणची भूमी कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही; खा. विनायक राऊतांचा इशारा

केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारकडून भांडवलदारांचे हित...

विरोधकांचा सूपडासाफ करून राणे दिल्लीत पोहोचतील : मुख्यमंत्री सावंत

ना. नारायण राणे यांना दिल्लीला पाठवायचेय. यासाठी...

वाटेला गेलात तर बैठकांमध्ये तमाशा करू – अविनाश जाधव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
HomeIndiaआठवड्यातून दोनवेळा सीएनजी दरात बदल, सर्वसामान्यांना झळ

आठवड्यातून दोनवेळा सीएनजी दरात बदल, सर्वसामान्यांना झळ

आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती गगनात पोहोचल्या आहेत.

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य हाणता आधीच पोळलेली असून आता सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात अजून एक मोठा झटका बसला आहे. दिल्लीत इंद्रप्रस्थ गॅसने सीएनजीच्या दरात ७५.६१ रुपयांनी वाढ केली आहे. नोएडा, गाझियाबाद, ग्रेटर नोएडासाठी सीएनजीची किंमत ७८.१७ रुपये प्रति किलो झाली आहे. त्याच वेळी, गुरुग्राममध्ये त्याची किंमत आता ८३.९४ रुपये प्रति किलो आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून दिल्ली-एनसीआरसह शहरांच्या सीएनजी दरात बदल करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती गगनात पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत देशांतर्गत किमती आणखी वाढू शकतात. याशिवाय नजीकच्या काळात गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामलीमध्ये सीएनजी गॅसची किंमत ८२.८४ रुपये प्रति किलो झाली आहे. रेवाडीत सीएनजी गॅसची किंमत ८६.०७ रुपये प्रति किलो झाली आहे. याआधी मधील आठवड्यातच १५ मे रोजी सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.

सीएनजीचे एकट्या एप्रिल महिन्यामधेच ७.५० रुपयाने महागला आहे. जगभरातील अर्थव्यवस्था कोरोनामुळे उद्भवलेल्या मंदीतून सावरल्यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय गॅसच्या किमती वाढू लागल्याने गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून शहरातील गॅस वितरक वेळोवेळी किमती वाढवत आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर आजही जसे होते तसेच स्थिर आहेत. आज सलग ४४ वा दिवस असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींपासून जनतेला सध्या मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे एलपीजी गॅस सिलिंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९६.६७ रुपये प्रति लिटर विकले गेले.

RELATED ARTICLES

Most Popular