29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunचिपळुणातील उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग अजुनही तसाच, डिझाईननंतर काढणार

चिपळुणातील उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग अजुनही तसाच, डिझाईननंतर काढणार

पुलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या सव्र्हस रोडवरून वाहतूक सुरू असल्याने पुलाचे चित्र काहीसे भीतीदायक आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाचा भाग आणि त्यावरील लाँचर अजूनही काढलेले नाही. कोसळलेल्या पुलाचा भाग काढण्याबाबत आता डिझाईन तयार करण्याचे काम सुरू असून ते तयार होऊन त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय तज्ज्ञ चौकशीचा अहवालही अद्याप महामार्ग विभागाला प्राप्त झालेला नसल्याने उड्डाणपुलाच्या एकूणच सर्व कामाला विलंब लागणार असल्याचे चित्र आहे. महामार्गावर शहरातून जात असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच १५ दिवसांपूर्वी त्यातील काही भाग लाँचरसह मधोमध कोसळला. यामुळे महामार्गावरील कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली.

दरम्यान, उड्डाणपूल दुर्घटनेनंतर त्याच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तज्ज्ञ समिती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार या समितीतील टंडन कन्सल्टन्सीचे मनोज गुप्ता, हेगडे कन्सल्टन्सीचे सुब्रमण्य हेगडे या दोन तज्ज्ञांनी दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी करतानाच पुलाचे बांधकाम करणाऱ्यांमधील कंत्राटदार, निरीक्षण करणाऱ्या कंपनीचे अभियंते, अधिकारी यांचे जबाब घेतले. कोंडमळा येथे गर्डर बनवले जातात, त्या कास्टिंग प्लान्टमध्ये जाऊन तेथील साहित्याचीही पाहणी करतानाच तेथील संबंधितांचे जाबजबाब घेत चौकशी पूर्ण केली.

आठवडाभरात या समितीकडून प्राथमिक अहवाल महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांना प्राप्त होणार होता. मात्र तो अजूनही प्राप्त झालेला नाही. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग अजूनही जाग्यावर तसाच पडून आहे. दुर्घटनाग्रस्त पुलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या सव्र्हस रोडवरून वाहतूक सुरू असल्याने पुलाचे चित्र काहीसे भीतीदायक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular