21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeRatnagiri'वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा' आ. राजन साळवींच्या समर्थनार्थ लागले बॅनर

‘वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा’ आ. राजन साळवींच्या समर्थनार्थ लागले बॅनर

'कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष' असा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने धाड टाकल्यानंतर राजकारण तापले असून आ.राजन साळवींच्या समर्थनाचे रत्नागिरीत आता बॅनर लागले आहेत. ‘वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा’ असा मजकूर या बॅनरवर असून तो चर्चेचा विषय बनला आहे. आ. राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून गुरुवारी झाडाझडती घेण्यात आली. आतापर्यंत सहा वेळा राजन साळवी हे चौकशीसाठी अलिबाग येथील एसीबीच्या कार्यालयात हजर राहिले आहेत. दरम्यान, गुरुवारी झालेल्या कारवाईनंतर साळवी यांचे कार्यकर्ते आक्रमक होतांना पाहायला मिळत असून, शहरातील अनेक भागात बॅनर लावून विरोधकांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

‘कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष’ असा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आला आहे. आपल्यावर करण्यात येत असलेली कारवाई राजकीय द्वेषातून करण्यात येत असून, आपण उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याने अशी कारवाई होत असल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला आहे. त्यानंतर एसबीच्या पथकाच्या चौकशीनंतर राजकीय विरोधकांना इशारा देण्याचा प्रयत्न राजन साळवींच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. यासाठीच शहरातील अनेक भागात बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे सकाळपासून या बॅनरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular