25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeMaharashtraअयोध्या मंदिरातील राम प्रभू कमळात विराजमान

अयोध्या मंदिरातील राम प्रभू कमळात विराजमान

सावळा गं रामचंद्र ! राजस, सुकुमार 'रामलला'ची मुर्ती.

२२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. १८ जानेवारीला गाभाऱ्यात मूर्ती ठेवण्यात आली. या मंदिरातला मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. रामलल्लाची ५१ इंच (४.२५ फूट) उभी मूर्ती. प्रभू राम कमळाच्या आसनावर विराजमान आहेत. त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे. आसन मकराना संगमरवरने बनलेले आहे. त्यावर ४ फूट उंच सिंहासन बसवण्यात येणार आहे. यावर रामलल्ला विराजित होतील. संपूर्ण सिंहासन सोन्याने मढवले जाईल. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात अरणी मंथन करण्यात आले. यानंतर श्रीगणेशाची पूजा झाली.

सर्व द्वारपालांचे पूजन करण्यात आले आणि प्रभू रामलल्ला यांना औषधालयात निवास करण्यात आला. यानंतर केशर आणि शुद्ध गाईच्या तुपात निवास केला जाईल. अरणी मंथनातुन प्रकट झालेला. अग्नी कुंडांमध्ये प्रस्थापित केला जात आहे. यानंतर ग्रहांची स्थापना, भगवान शंकराच्या आसनाची स्थापना आणि अयोध्येच्या मुख्य देवतेची स्थापना होईल. श्री राम यंत्र, योगिनी, मंडळ क्षेत्रपाल, अधिकारी यांची आराधना केली जात आहे. रामलल्ला म्हणजेच बाळ रुपातील राम या मंदिरात असणार आहेच. याशिवाय अरुण योगीराज यांनी शाळीग्राम दगडापासून घडवलेली रामाची मूर्तीही असणार आहे. अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे.

याच मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर या फोटोची चर्चा होते आहे. राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. मैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण योगीराज यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्पं साकारली आहेत.

अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार. तर, त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना मैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं. मूर्तीची वैशिष्ट्ये गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ती सावळ्या रंगाची आहे आणि ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरुप आहे. ५ वर्षांच्या रामाची ही मूर्ती आहे जी गाभाऱ्यात बसवली जाईल आणि त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ तारखेला पार पडणार आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीचं वजन २०० किलो आहे. गाभाऱ्यात ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे आणि २२ जानेवारी या दिवशी दुपारी १२.२० या वेळी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होईल जो दुपारी १ वाजपेर्यंत चालण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular