कथित बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या आमदार राजन साळवी यांच्या पत्नी सौ. अनुजा साळवी आणि त्यांचे चिरंजीव शुभम साळवी यांना मुंबई न्यायालायने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे साहकी कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. आमदार राजन साळवी यांच्यावरही याब आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला अन्य तरी त्यांनी स्वतःच्या अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची तलवार कायम आहे रायगड लाचलुचपत प्रतिबंक विभागाच्यावतीने आमदार राजन साळवी यांच्या मालमत्तेची सहावेळा चौकशी करण्यात आली.
अलिबाग येथे ही चौकशी झाली. आमदार राजन साळवी स्वत: तेथे गेले. त्याचप्रमाणे वा प्रकरणात त्यांच्या पत्नी सौ. अनुजा साळवी, मुलगा शुभम साळवी, भाऊ दिपक साळवी आणि पुतण्याचीही चौकशी एसीनीने (अॅन्टी करपान ब्यूरो) केली. जवळपास सव्वा वर्ष हि चौकशी सुरू आहे. या दरम्यान आमदार साळवी यांच्या रत्नागिरीतील घरातील, सामानाची मोजदादही करण्यात आली. १८ जानेवारी रोजी आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरावर एसीबीने छापा टाकला. त्यांचे बंधू दिपक साळवी आणि संजय साळवी यांच्या घराचीही एसीबीच्या टीमने झाडाझडती घेतली. दरम्यान, कथित बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपाखाली राजन साळवी यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. अनुजा साळवी, मुलगा शुभम साळवी यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेव्हापासून त्या तिघांवरही अटकेची टांगती तलवार आहे. आपण राजकारणात आहोत, अशा प्रकरणांना तोंड देण्यास समर्थ आहोत. मात्र आपली पत्नी आणि मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब आपल्या मनाला वेदना देणारी आहे, असे आमदार राजन साळवी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सौ. अनुजा साळवी आणि शुभम साळवी यांच्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र सत्र न्यायालयाने हा जामीन फेटाळला. त्यानंतर सौ, अनुजा साळवी आणि शुभम साळवी यांनी हायकोर्टात अर्ज केला. १२ फेब्रुवारीला त्याच्यावर सुनावणी झाली. १३ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाने सौ. अनुजा साळवी आणि शुभम साळवी या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे साळवी कुटुंबियांरा दिलासा मिळाला आहे.