27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriकोकणातील अन्य पक्ष अलर्ट मोडवर, सभांचे नियोजन सुरू

कोकणातील अन्य पक्ष अलर्ट मोडवर, सभांचे नियोजन सुरू

जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड ढिली होण्याची भीती राष्ट्रवादीला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याने स्थानिक शिवसेनेला बळ मिळालेच; पण रायगड लोकसभा मतदार संघाचा विचार करता अन्य पक्षांतील राजकीय हालचालीही अचानक वाढल्या आहेत. महाआघाडीत रायगड-रत्नागिरीच्या जागेवर अनंत गीते लढतील हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) आहे. त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाने विरोध करून आधीपासूनच वादाची ठिणगी टाकली आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद मिळू न देण्यापासून सुरू झालेल्या या वादात आता लोकसभेच्या जागेवर दावा सांगण्या इतकी प्रगती झाली आहे; पण दावा करूनही त्यांच्याकडे ठोस उमेदवार नाही.

पक्षाची लोकसभेसाठी तयारीही नाही. आता शिंदे गट दावा सांगतोय म्हटल्यावर भाजपनेही धैर्यशील पाटील यांना पुढे करत आपलाही हक्क पुढे केला आहे. जिथे पक्षाची स्थिती मजबूत आहे तो मतदार संघ देण्याची राजकीय हाराकिरी राष्ट्रवादी करेल का, हा प्रश्नच आहे. एकदा भाजपकडे जागा गेली, तर जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड ढिली होण्याची भीती राष्ट्रवादीला आहे. पक्ष फुटूनही स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेने (उबाठा) मिळवलेल्या यशामुळे पक्षाला उभारी मिळाली आहे. आजवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असलेला मुस्लिम मतदार ठाकरेंच्या सभांना हजेरी लावताना दिसत आहे.

हा मतदार नव्या राजकीय पर्यायाचा विचार करतोय की काय, असे चित्र दिसत आहे. आपला मूळ मतदार अन्यत्र जाऊ नये यासाठी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांनी अल्पसंख्यांक मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटानेही दंड थोपटले असून, ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. शेकापने अलिबागचा विचार करून महाआघाडीला आपले बळ देण्याचा निर्णय कायम ठेवला.

भाजपचे एक पाऊल पुढे – दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना पक्षात घेऊन भाजपने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हा मतदार संघ भाजपला सोडतील आणि राज्यसभेवर जातील, अशा चर्चाही रंगल्या; पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतच्या राज्यव्यापी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केलेल्या चार लोकसभा मतदार संघांत रायगड होता, याचा अनेकांना विसर पडला.

RELATED ARTICLES

Most Popular