26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeKhedआ. शेखर निकमांच्या प्रचारासाठी पोफळीत आज ना. सामंतांची सभा

आ. शेखर निकमांच्या प्रचारासाठी पोफळीत आज ना. सामंतांची सभा

पोफळी नाका येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोफळी नाका येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमतून पोफळी जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या सभेला राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री तसेच शिवसेना नेते ना. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महायुतीतर्फे चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते विद्यमान आमदार शेखर निकम हे महायुतीचे उमेदवार आहेत. सोमवारी सकाळी चिपळूण शहरात चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरवाचे दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तर आता ग्रामीण भागाकडे देखील लक्ष देण्यात आले असून मंगळवारी पोफळीमध्ये प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ पोफळी नाका येथे सकाळी ११ वाजता राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री शिवसेना नेते ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पोफळी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य बाबू साळवी यांनी दिली. पोफळी गणांमध्ये आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून नळ पाणी योजनांसह रस्ते पाखाडी यांसारख्या विकास काम ांना निधी देखील मिळाला असल्याची माहिती साळवी यांनी यावेळी दिली. पोफळी गणातील मतदार बंधू-भगिनी आमदार निकम यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास देखील साळवी यांनी यावेळी व्यक्त केला.

या सभेला महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्यासह माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते, माजी आमदार विनय नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सभापती शौकत मुकादम, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, ज्येष्ठ नेते जिल्हा नियोजन मंडळ सदस्य दादा साळवी, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. दिशा दाभोळकर, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश आयरे, माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, शिरगाव सोसायटी चेअरमन जयंतराव शिंदे, कोंडफणसवणेचे माजी सरपंच मधुकर इंदुलकर, ज्येष्ठ नेते किसन पवार, डॉ. शिवाजी मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. जागृत्ती शिंदे, वैभव पवार, शिरगावचे माजी सरपंच अनिल शिंदे, पोफळी सरपंच उस्मान सय्यद, माजी उपसरपंच अब्दुला सय्यद, पोफळी ग्रामपंचायत सदस्य संजय बामणे, कुंभार्ली सरपंच रवींद्र सकपाळ, निलेश कोलगे, पोफळीचे ग्रामपंचायत माजी सदस्य रवींद्र पंडव, सुरेश घाणेकर, इब्राहिम सय्यद, तसेच पोफळी गणातील सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य याचबरोबर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular