25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriनिवडणुकीच्या धामधुमीत कोकणात देवदेवस्की, भगतगीरीला ऊत

निवडणुकीच्या धामधुमीत कोकणात देवदेवस्की, भगतगीरीला ऊत

शहरालगतच्या भागात हे सारे साहित्य आढळले आणि काळी जादू केल्याचा प्रकार उघड झाला.

निवडणूक प्रचाराच्या तोफा धडधडू लागण्यापुर्वीच कोकणात देवदेवस्की, भगतगिरीला ऊत आला असून विरोधी उमेदवाराचा पाडाव व्हावा, आपल्यालाच यश मिळावे याहेतूने काळी जादू, जादूटोणा, भानामतीचा आधार घेत अघोरी पूजेचे व्रत अनेकांनी हाती घेतले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मध्यरात्रीनंतर हे अघोरी विधी सुरु असतात. विरोधकाचा ‘कारखाना’ उठविण्यासाठी काळ्या जादूचे जालीम प्रयोग कोकणात अनेक ठिकाणी सुरु झाले आहेत. केवळ कोकणातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातदेखील या भगतगिरीचे प्रयोग होत असल्याचे वृत्त असून काही ठिकाणी यासाठी लागणारे साहित्य सापडल्याने ही भगतगिरी उघडकीस आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरालगतच्या जंगलमय भागात कवळ फळ, काळी बाहूली, फुले, अंडी, लिंबू, टाचण्या, अबीर गुलाल, हळद-पिंजर आदी साहित्यांने भरलेला एक बॉक्स काही गावकऱ्यांना आढळला आणि या प्रकाराची चर्चा सुरु झाली आहे. सांगली परिसरातील टिंबर भागामध्ये काळ्या जादूच्या प्रयोगात वापरण्यात येणारे हे साहित्य आढळल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकीत आपल्या विरोधकाचा ‘कारखाना’ उठावा या हेतूने ही अघोरी पूजा अथवा व्रत केले जाते असे गावकऱ्यांमध्ये चर्चीले जाते.

श्रद्धा-अंधश्रद्धांचा पगडा – ‘प्रेमात आणि युद्धात सारे काही क्षम्य असते’ अशा आशयाची एक म्हण इंग्रजीत आहे. निवडणूक हेदेखील लोकशाहीच्या मार्गाने लढले जाणारे युद्ध आहे. समाजातील सर्व प्रथा परंपरांचा पगडा निवडणुकीतही पहायला मिळतो. श्रद्धेचा भाग म्हणूनच उमेदवार शुभ मुहूर्तावर अर्ज भरतात. अर्ज भरण्यापूर्वी किंवा प्रचाराच्या सुरुवातीला देवाचे आशिर्वाद घेतात. हा झाला श्रद्धेचा भाग. अंधश्रद्धांचा पगडाही या निवडणुकीच्या निमित्ताने पहायला मिळतो आहे.

देवदेवस्की सुरु – कोकणात देवदेवस्कीचे फार मोठे प्रस्थ आहे. आपल्या विरोधकांचा नाश व्हावा, आपल्यावरील संकटे टळावीत आणि आपले भले व्हावे या हेतूने अनेक ठिकाणी काळी जादू, करणीचे प्रकार होत असतात. निवडणूकही या प्रकारांपासून दूर नाही. निवडणूकीतही आपल्या विरोधी उमेदवाराच्या पाडावासाठी देवदेवस्की सुरू असून भगताना मोठी मागणी आहे. दिवाळीच्या अमावस्येच्या मुहूर्तावर काही ठिकाणी निवडणुकीच्या लढाईत आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पाडाव व्हावा या हेतूने असे प्रकार घडल्याचे वृत्त आहे.

रस्त्याच्या कडेला पूजाअर्चा – हा जादूटोणा मध्यरात्रीनंतर केला जातो. शक्यतो आडोसा पाहून अशी कृत्ये केली जातात. शहरालगतच्या गावातील जंगल परिसराची निवड त्यासाठी केली जाते. अशी जंगलमय जागा न मिळाल्यास रस्त्याच्या कडेला पूजाअर्चा केली जाते. अशाच प्रकारे झालेल्या काळ्या जादूचे प्रताप रस्त्याच्या कडेला दिसून आले. तेथे देवदेवस्की झाल्याचा संशय बळावेल असे साहित्य आढळले. त्यामध्ये टाचणी टोचलेली लिंबे, काळी बाहूली, अबीर गुलाल, हळद-पिंजर, फुले, दगड-धोंडे अशी सारी यथासांग पूजेची मांडणी दिसून येताच गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलीसांपर्यंत खबर पोहचताच पोलीसांनी घटनास्थळी येवून सारे साहित्य ताब्यात घेतले.

निवडणुकीसाठीच…. – शहरालगतच्या भागात हे सारे साहित्य आढळले आणि काळी जादू केल्याचा प्रकार उघड झाला. या साहित्यासोबतच एका कागदावर ‘विरोधकांचा नाश व्हावा’ असा मजकूर लिहून ठेवला होता. त्याआधारे हे सारे निवडणुकीत विरोधकांचा पाडाव व्हावा या हेतूनेच केले गेल्याची खात्री पोलीसांची झाली असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

कोकणात जालीम भगत – निवडणुकीच्या काळात कोकणातही अशा प्रकारच्या देवदेवस्कीला ऊत येतो. हे अनेकवेळा आढळले आहे. कोकणात भगतगीरीची मोठी चर्चा नेहमीच सुरु असते. यामध्ये काही प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे करणी. दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी केली जाते ती करणी असे म्हणतात. भगत आणि सांत्रिकांच्या सांगण्यावरून ती केली जाते. सर्व साधारणपणे करणीसाठी लाल कापड, नारळ, नागवेलीची पाने (विड्याची पाने), कापसापासून बनविलेल्या काळ्या रंगाच्या बाहुल्या, अगरबत्ती, धूप, हळद-कुंकू असे साहित्य लागते. ज्याच्यावर करणी करायची आहे त्याचे नाव लिहीलेही जाते. भगत आणि म ांत्रिक पुटपुटात. ज्याला त्रास द्यायचा आहे त्याच्या नावाने लिंबाला टाचण्या टोचून पूजाअर्चा केली जाते.

करणीचा उतारा – या करणीचा उताराही ठरलेला आहे. साध मीठ, मोहरी, मिर्ची घेवून ३ वेळा उलट्या हाताने मीठ, मोहरी पेटत्या निखाऱ्यांवर टाकून उतारा केला जातो.

चेटूक – या भगतगीरीचा दूसरा प्रकार आहे तो म्हणजेच चेटूक. दूसऱ्याला पीडा देण्यासाठी चेटूक ही अघोरी ‘शक्ती असल्याचा समज या प्रकारांवर विश्वास ठेवणाऱ्यांचा आहे. मांत्रिक मंत्र पुटपुटत चेटूक करत असतो.

बायंगी भूत – कोकणात देवदेवस्कीचा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे बायंगी भूत. हे मात्र कोणाचे वाईट करण्याच्या हेतूने केले जात नाही तर स्वतःची भरभराट व्हावी, विजय मिळावा, सुखशांती लाभावी यासाठी या बायंगी भूताचा उपयोग केला जातो. मध्यरात्री पूजाअर्चा केली जाते आणि भागवणी करावी लागते…

मोठा खर्च – ही सारी अघोरी विद्या करण्यासाठी मोठा खर्चही येतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऊत आलेल्या या भगतगीरीमध्ये हजारो रुपये कमावले जातात. त्यासाठी जालीम भगत आपली दामदुप्पट फी वसूल करत असतात. २१व्या शतकातही निवडणुकीचे मतदान इव्हीएममुळे हायटेक झाले असले तरीही अंधश्रद्धांचा आधार घेत अजूनही असे प्रकार केले जातात. जादूटोणा विरोधी कायदा ज्यांच्या सहभागातून अधिक बळकट व्हावा अशी अपेक्षा ज्यांच्याकडून करायची त्यांच्यापैकीच काही जण निवडणूकीतील यशासाठी अशा अघोरी कृत्यांचा आधार घेत असल्याची चर्चा कोकणात सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातदेखील असे प्रकार घडत असल्याचे उघड होताच अनेकांना धक्का बसला आहे. पुरोगामी विचारांच्या महासष्ट्रावर अजूनही अंधश्रद्धांचा पगडा किती मजबूत आहे याचेच हे उदाहरण मानावे लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular