29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...
HomeEntertainmentकॉमेडीयन राजु श्रीवास्तव यांचे निधन

कॉमेडीयन राजु श्रीवास्तव यांचे निधन

ट्रेडमिलवर धावता धावता राजू खाली कोसळले. त्याला हदयविकाराचा झटका आल्याचे सुत्रांनी सांगितले होते.

कॉमेडिचा बादशहा अशी ओळख असणारे आणि गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन करणारे राजू श्रीवास्तव यांचे उपचाराअंती निधन झाले आहे. मागील महिनाभर ते आपल्या आयुष्याशी झुंज देत होते. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. कित्येक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी तो ट्रेड मिलवर धावत असताना त्याला अचानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्सममध्ये दाखल करण्यात आले होते.

अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजु श्रीवास्तवचे आज अखेर निधन झाले आहे. पहिल्या लाफ्टर चँलेजचे विजेतेपद हे सुनील पालनं मिळवलं होतं. मात्र त्यात सगळ्यात लक्षवेधी ठरला तो राजु श्रीवास्तव. राजुनं त्या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली. घराघरात त्याचे नाव झाले. तो प्रेक्षकांच्या आवडीचा सेलिब्रेटी झाला होता. आता मात्र त्याच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

राजुनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले. त्यानं मालिका, चित्रपट, जाहिराती यामध्ये काम केले. याशिवाय काही हिंदी विनोदी नाटकांमध्ये देखील त्यानं केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते. नव्वदच्या दशकांतील टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका करुन राजु श्रीवास्तवची मोठी झलक इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये दिसली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता.

राजू जवळपास ४० दिवसांपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. ट्रेडमिलवर धावता धावता राजू खाली कोसळले. त्याला हदयविकाराचा झटका आल्याचे सुत्रांनी सांगितले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो क्लिनिकल उपचारांना प्रतिसाद देत असल्याचेही सांगण्यात आले होते. राजु केवळ कलाकार म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही तो प्रेरणादायी होता. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहे. राजुला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आदरांजली वाहिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular