27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

आमदार योगेश कदम यांना मिळणार मंत्रिमंडळात संधी…!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसेनेमध्ये झालेल्या उलथापालथी...

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...
HomeKokanनागपूर ते मडगाव दरम्यानची विशेष रेल्वेगाडी ऑक्टोबर पर्यंत धावणार

नागपूर ते मडगाव दरम्यानची विशेष रेल्वेगाडी ऑक्टोबर पर्यंत धावणार

या गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३० ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आविदर्भ ते कोकण जोडणारी ही गाडी आता ३० ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३० ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री आठ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता ते नागपूरला पोहोचेल. मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री आठ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता ते नागपूरला पोहोचेल. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर ते मडगावपर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचेल.

नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular